💥पूर्णा तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाचे काम वेगाने होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करावी...!


💥असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले यांनी केले आहे💥

पूर्णा - पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरनाचा वेग वाढवण्यासाठी माझे गाव माझी जबादारी समजून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जनजागृती करून लसीकरण वाढवावे असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले यांनी केले आहे.

     सध्या राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक शासकीय ग्रामीण रुग्णालय,आरोग्य केंद्र व उप केंद्र येथे कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे पण ग्रामीण भागात लस विषयी अजूनही गैरसमज आहे  तो गैर समज दूर करण्यासाठी गावातील सरपंच, चेअरमन, गावातील विविध पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला सपत्नीक लस घेऊन  आपल्या आपल्या गावात लस घेण्यासाठी जनजागृती करावी म्हणजे लस घेण्याचे काम मोठया प्रमाणात होईल जोपर्यन्त लस सर्व नागरिक घेणार नाहीत तो पर्यंत कोरोना आटोक्यात येणार नाही  अशी परिस्थिती आज तरी दिसत आहे त्यामुळे लसी करणाबाबत आवाहन करावे मी या माध्यमातून शिवसेनेच्या सर्व तालुका पातळी पासून जे गाव पातळी पर्यंत सर पदाधिकारी व शाखा प्रमुख आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की माझे गाव माझी जबादारी समजून सर्वांनी लस घेण्यासाठी आपआपल्या गावातील नागरिकांना प्रवृत्त करून लसीकरण मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी याना मदत करून राज्य शासनास सहकार्य करावे अशी विनंती केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या