💥गंगाखेड तालुक्यातील बडवणीत कडब्याची गंजी जळून खाक....!


💥या शेतकऱ्यास मदत मिळावी अशी मागणी तहसील कार्यालयाकडे सोमवारी करण्यात आली💥

गंगाखेड तालुक्यातील बडवणी येथील एका शेतकऱ्याची कडब्याची गंजी गुरुवारी (8 मार्च)अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली .या शेतकऱ्यास मदत मिळावी अशी मागणी तहसील कार्यालयाकडे सोमवारी करण्यात आली.

 वडवणी येथील शेतकरी ज्ञानदेव मुंडे यांच्याकडे नऊ जनावरे आहेत. या जनावरासाठी त्यांनी आपल्या शेतातील चारा एका ठिकाणी जमा करून ठेवला होता .5000 पेढ्याची गंजी सुरक्षित तयार करून ठेवली असताना बाजूच्या गायरान जमिनीस लागलेली आग यांच्या शेतात आल्याने सदर कडव्याची गजीही जळून खाक झाली. यात सुमारे नुकसान झाले.तरी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तहसील कार्यालयाकडे लेखी स्वरुपात करण्यात आली .निवेदनावर धनगर साम्राज्य सेनेचे  संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर ,शेतकरी ज्ञानदेव मुंडे ,माजी सरपंच जयदेव मिशे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या