💥डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एक काय शंभर गुन्हे दाखल केले तरी घाबरणार नाही - राज नारायनकर


💥सार्वजनिक भिम व बुध्द जयंती मंडळातील पदाधिकाऱ्यांसह ५२ लोकांवर गुन्हे दाखल आंबेडकवादी जनसमुदायात तिव्र असंतोष💥

पुर्णा (दि.२० एप्रिल) - शहरात दि.१४ एप्रिल २०२१ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात शांततेत साजरी करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवा दरम्यान पुर्णा पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवून या कार्यक्रमात सहभाग ही नोदवला यावेळी हजारों आंबेडकरवादी माता-भगीनी व तरुणांच्या उपस्थितीत प्रशासकीय निर्देशांचे पालन करीत सार्वजनिक भिम व बुध्द जयंती मंडळाच्या आपल्या आराध्य दैवताला मानवंदना म्हणून शहरातून परमपुज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची मिरवणूक अत्यंत शांततेत काढण्यात आली परंतु प्रशासनाने तमाम आंबेडकवादी जनसमुदायाच्या भावननांचा विचार नकरता मंडळातील आठ ते दहा पदाधिकाऱ्यांसह तब्बल ५२ लोकांसह इतर दोनशें ते अडीचशें लोकांवर पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हे दाखल केल्याने तमाम आंबेडकरवादी जनसमुदायातून संताप व्यक्त केला जात आहे.

 या घटने संदर्भात दलीत चळवळीतील युवा नेतृत्व राज नारायनकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना युवा नेते राज नारायनकर म्हणाले की करोडो दिन-दलीतांचे उध्दारकर्ते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपुज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एक काय प्रशासनाने शंभर गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरनार नाहीत अहो स्वतःची चुक लपवण्यासाठी अनेक निरपधार भिम सैनिकांवर चुकीची कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. 

पूर्णा पोलिस प्रशासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दोन दिवस अगोदर दि.१२ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ५-०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या. शांतता कमिटीच्या बैठकी मध्ये सर्व सार्वजनिक भिम जयंती मंडळाचे पदाधिकारी व गावातील शांतता कमिटीचे अनेक सदस्यांसह मी स्वतः पण शांतता कमिटीचा सदस्य या नात्याने पोलिस प्रशासनाच्या निमंत्रणावरून त्या ठिकाणी उपस्थित होतो बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले.पुर्णा तालुक्यातील प्रशासनातील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी यांच्यासह शांतता समितीची बैठक आयोजित करणारे पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलिस निरिक्षक भागोजी चोरमले साहेब यांनी संबंधित बैठकीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कश्या प्रकारे साजरी करावी या बदल मार्गदर्शन केले परंतु भिम जयंती मिरवणूक काढावी का नाही काढावी असा कुठलाही मुद्दा संबंधित पोलिस निरीक्षक चोरमले साहेबांनी मांडला नव्हता ..विचार केल्यास एका प्रकारे शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक काढण्याची प्रशासनाच्या वतीने मूक संमतीच देण्यात आली होती असं माझं स्पष्ट मत आहे असेही राज नारायनकर म्हणाले पुढे बोलतांना ते म्हणाले की शांतता समितीत झालेल्या प्रत्येक गोष्टीचा मी स्वतः साक्षिदार आहे यावेळी पुढे बोलतांना श्री नारायनकर म्हणाले की मी जयंती मंडळाचा कुठलाही पदाधिकारी किंवा साधा सदस्य नसताना पण राजकीय द्वेषातून. मी सोशल मिडिया द्वारे शहरातील प्रस्थापित राजकीय लोकांच्या व प्रशासनाच्या विरोधामध्ये प्रशासन व शहरातील राजकीय भ्रष्टाचारी लोक करित असलेल्या चुकिच्या कामांची माहिती जनतेच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणुन देत असल्या मुळेच माझ्या विरोधात केवळ सूड उगवण्याच्या भावनेतूनच सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. माझ्यासह ज्या निरपराध भिम सैनिकांच्या विरोधात जो विनाकारण खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा. व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यास प्रथमतः मुक संमती देण्यास व नंतर जयंती मंडळ पदाधिकाऱ्यांसह निरपराधांवर गुन्हे दाखल करण्यास जिम्मेदार असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा.अन्यथा प्रशासनाच्या  विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राज नारायनकर यांनी दिला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या