💥पुर्णा तालुक्यातील सोन्ना गावच्या संरपंचांचा कौतुकास्पद उपक्रम एकाच दिवसात केले १०० लोकांचे लसीकरण...!


💥लसीकरण जनजागृती फेरी काढून गाव कोरोनामुक्त करण्याचा दिला प्रत्यक्ष कृतीतून संदेश💥


पुर्णा (दि.२५ एप्रिल) - परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातही सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजवला असतांना या भयावह परिस्थितीत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत सर्वसामान्य जनतेच्या मतदानावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी केवळ प्रसिध्दीसाठी फोटोसेशन करून आम्ही कोरोना महामारीत जनतेच्या हितासाठी स्वतःच्या जिवाचीही पर्वा नकरता जनतेला कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी खुपकाही करीत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतांना मात्र तालुक्यातील सोन्ना या गावातील सरपंच/उपसरपंच मात्र प्रत्यक्ष आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून स्वतःच्या जिवाचीही पर्वा नकरता सोन्ना गाव कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने पावल उचलत कर्तव्याची तालुक्यातील अन्य लोकप्रतिनिधींना जाणीव करून देत असून सरपंच शरद कदम,शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष माधव कदम,मुख्याध्यापक घरडे,शिंदे यांनी  सोन्ना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरातून दि.२३ एप्रिल २०२१ रोजी जनजागृती फेरीचे आयोजन करीत गावातील एकाच दिवसात तब्बल १०० लोकांचे लसीकरण करण्याचा धाडसी उपक्रम राबवल्याने त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.


यावेळी सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील गोविंद कदम,श्रावण कदम,स्वप्निल कदम,नागनाथ कदम यांच्यासह गावातील गावकरी मंडळींनी विशेष प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या