💥रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या वितरकासह दोघांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या....!


💥रेमडेसिविरचे २८४ इंजेक्शन जप्त,दुप्पट किमतीत सुरू होती विक्री💥

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या औषध वितरकासह दोघांना गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या त्यांच्याकडून २८४ इंजेक्शन हस्तगत करण्यात आली वितरक आणि त्याचे साथीदार दुप्पट किमतीस इंजेक्शनची विक्री करत होते गेल्या काही दिवसांत वितरकाने दोनशेहून अधिक इंजेक्शने काळ्याबाजारात विकल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे जावेद रेहमान अख्तर आणि सरफराज हुसेन अशी अटक आरोपींची नावे आहेत यापैकी जावेद जोगेश्वरीतील जी. आर. फार्मा कंपनीचा मालक असून हुसेन त्याच्याकडे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे सहायक निरीक्षक वाहिद पठाण यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत पश्चिम उपनगरांत रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. 


उपायुक्त अकबर पठाण प्रभारी निरीक्षक किरण लोंढे यांच्या सूचनेनुसार पठाण यांनी अंधेरी परिसरात बोगस ग्राहक पाठवून सापळा रचला त्यात हुसेन आठ हजार रुपयांत इंजेक्शनची विक्री करताना रंगेहाथ सापडला चौकशीत त्याने जावेदचे नाव घेतले त्यानुसार जावेदच्या कंपनी कार्यालयात छापा घातला असता तेथे २७२ इंजेक्शने आढळली तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बोगस ग्राहक हुसेनशी चर्चा करत असताना तीन रुग्णांचे नातेवाईक त्याच्याकडून आठ हजार रुपये या दराने इंजेक्शन घेऊन गेले तसेच जावेदच्या जी. आर. फार्माला उत्पादक कंपनीकडून  रेमडेसिविरचा सतत पुरवठा सुरू होता असेही गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या