💥परळीत लाॅकडाऊनच्या कडक अंमलबजावणीस सुरवात.....!


💥अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार आणि दुकाने बंद आहेत💥

परळी  (दि.१८ एप्रिल) - महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊनची परळी तालुक्यात प्रशासनाच्या वतीने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे .अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार आणि दुकाने बंद आहेत. 

बीड जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. तसेच राज्यातही झपाटय़ाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  14  एप्रिल राञी  8  वा. पासून दिनांक 1 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा,  भाजीपाला,कृषी, वगळता इतर सर्व बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

💥पोलिसांचा चोख बंदोबस्त💥 

शहरात लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महसूल प्रशासन, नगरपालिका कर्मचारी व अधिकारी तसेच पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. विनाकारण बाहेर फिरणारावर कारवाई होणार असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या