💥कोरोनाची दुसरी लाटकिती काळ राहणार ? कानपूर आयआयटी च्या वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा...!


💥भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक मणिंद्र अग्रवाल यांनी ‘सूत्र’ प्रारूपाचा वापर करून पुन्हा अंदाज वर्तवलाय💥

✍️  मोहन चौकेकर

महाराष्ट्रासह देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा ही दुसरी लाट वेगानं पसरतेय. कोरोना रुग्णवाढीचा हा वेग आणखी किती दिवस सुरू राहणार याबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती समोर आली आहे.भारतात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर सूत्र या गणिती प्रारुपाचा वापर करून वैज्ञानिकांनी काही अंदाज बांधले होते. त्यानुसार ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या जास्त असेल. नंतर ती सप्टेंबरमध्ये अधिक असेल.फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी राहील, असा अंदाज या गणिती प्रारुपानुसार काढण्यात आला होता. तो अंदाज जवळपास खरा ठरलाय. आता कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक मणिंद्र अग्रवाल यांनी ‘सूत्र’ प्रारूपाचा वापर करून पुन्हा अंदाज वर्तवलाय.

त्यानुसार सध्याचं कोरोना संसर्गाचं प्रमाण एप्रिलपर्यंत शिखरावस्था गाठेल एप्रिल मध्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहील त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्ण कमी होतील असे अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय तर स्वतंत्र गणिती आकडेमोडीनुसार, हरियाणाच्या अशोक विद्यापीठाचे गौतम मेनन यांनीही दुस-या लाटेची शिखरावस्था ही एप्रिल मध्य आणि मे मध्य यांच्या दरम्यान राहील असा अंदाज वर्तवलाय मात्र हे केवळ गणितीय अंदाज आहेत. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचलीय कोरोना रुग्ण याच वेगानं वाढत राहिले आणि आपण सगळ्यांनी पुरेशी काळजी घेतली नाही तर हे अंदाज देखील चुकीचे ठरू शकतात.                                 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या