💥भारतीय हवामान विभागाने हवामानाच्या १२० वर्षांच्या नोंदी संकेतस्थळावर केल्या उपलब्ध...!


💥हवामान अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांनाही या नोंदी पाहता डाऊनलोड करता येतील💥 

पुणे - भारतीय हवामान विभागाने (आय.एम.डी.) गेल्या १२० वर्षांतील हवामानाच्या नोंदी स्वतंत्र संकेतस्थळाद्वारे उपलब्ध केल्या आहेत. या नोंदींसाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, हवामान अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांनाही या नोंदी पाहता डाऊनलोड करता येतील हवामान विभागाच्या पुणे कार्यालयाकडे सन १९०० पासूनच्या नोंदी संग्रहित आहेत गेल्या १२० वर्षांत सातत्याने घेतलेल्या नोंदींचे डिजिटायझेशनही करण्यात आले आहे.

 राष्ट्रीय विदा केंद्र (एन.डी.सी.) आणि हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातील क्लायमेट रीसर्च अँड सव्र्हिस (सी.आर.एस.) यांनी या नोंदींचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करून या नोंदी खुल्या केल्या आहेत देशभरात २०० वेधशाळा आणि ३००हून अधिक उपवेधशाळा हवामान विभागाच्या माध्यमातून चालवल्या जातात तसेच स्वयंचलित हवामान केंद्राच्या (ए.डब्ल्यू.एस.) अंतर्गत हवामान केंद्र आणि प्रादेशिक हवामान केंद्र (आर.एम.सी.) आहेत. 

हवामानाच्या अंदाजांची प्रारूपे ठरवण्यासाठी अचूक नोंदी आवश्यक असतात स्थानिक नोंदी आणि उपग्रहाकडून आलेल्या नोंदी राष्ट्रीय विदा केंद्रात साठवल्या जातात हवामानाच्या नोंदींमध्ये तापमान, उष्मा, पाऊस, हवेचा दाब आदी घटक दिवसभरातून आठ वेळा नोंदवले जातात या सर्व नोंदी विदा संकेतस्थळावर पाहता येतील. http://cdsp. imdpune. gov.in या संकेतस्थळावर हा विदा उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातील क्लायमेट रीसर्च अँड सर्व्हिसचे प्रमुख डॉ. डी. शिवानंद पै म्हणाले, की हवामान विभागाच्या पुणे कार्यालयाकडे शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी संग्रहित आहेत गेल्या काही वर्षांत डिजिटल पद्धतीने नोंदी घेतल्या जातात त्यामुळे पूर्वीच्या नोंदींचे डिजिटायझेशन करण्यात आले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या