💥परभणी जिल्ह्यात दि.१७ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ पर्यंत सूट दिलेल्या अस्थापना पुर्णपणे बंद राहणार....!


💥यात बँका,किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने,भाजीबाजार,फळ विक्रेते,बेकरी,मिठाई,खाद्य दुकाने आदींचा समावेश💥

परभणी (दि.१५ एप्रिल) - जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात काल बुधवार दि.१४ एप्रिल २०२१ पासून अत्यावश्यक सेवा म्हणून ज्या बाबींचा समावेश करण्यात आला होता त्यापैकी बँका, किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने,भाजीबाजार,फळ विक्रेते,बेकरी,मिठाई, खाद्य दुकाने वगैरे अस्थापना येत्या शनिवार दि.१७ एप्रिल पासून ते दि.२२ एप्रिल २०२१ पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज गुरुवार दि.१५ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी दिले आहेत....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या