💥मुंबईतील सर्वधर्मीय साधुसंत आणि जैन मुनींचे लसीकरण करण्यासाठी पालिकेने धोरण तयार करावे...!


💥साधू जैन मुनींना ओळखपत्राविना लस देण्याची मागणी भाजपाने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे💥

मुंबईतील सर्वधर्मीय साधुसंत आणि जैन मुनींचे लसीकरण करण्यासाठी पालिकेने धोरण तयार करावे अशी मागणी भाजपाने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे करोना लसीकरणासाठी नोंदणी करताना पॅन कार्ड अथवा आधारकार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो मात्र साधु हे सर्वत्र फिरत असतात व त्यांचा कायमचा पत्ता नसतो त्यामुळे त्यांच्याकडे आधारकार्ड नसते त्यामुळे त्यांना ओळखपत्राशिवाय लस देण्यासाठी धोरण तयार करावे अशी मागणी भा.ज.पा.ने केली आहे. 

गुजरातने यावर तोडगा काढत नोंदणीकृत धर्मादाय संस्था, मंदिर तसेच वयाबाबत डॉक्टरने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्यमानून लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे त्याच आधारावर मुंबईतही अशा प्रकारे लसीकरण करण्यात यावे त्यासाठी एक धोरण आखावे, अशी मागणी भा.ज.पा.चे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे केली होती अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी ही मागणी मान्य केल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या