💥परभणी जिल्ह्यात आज गुरुवारी उपचारा दरम्यान १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू....!


💥जिल्ह्यात आज गुरूवारी नव्याने आढळले ६७६ कोरोनाबाधीत रुग्ण💥

परभणी (दि.१५ एप्रिल) - परभणी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक थांबता थांबत नसून जिल्ह्यात अक्षरशः कोरोना महामारीने हाहाकार माजवल्याचे दिसत असून जिल्ह्यात आज गुरुवार दि.१५ एप्रिल २०२१ रोजी नव्याने ६७६ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले तर जिल्ह्यात रुग्णालयात उपचारा दरम्यान १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. तर रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या ५२२ कोरोनामुक्त व्यक्तींना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ५ हजार ४३५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आजपर्यंत ५९१ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत २३ हजार ५०२ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी १७ हजार ४७६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख ४ हजार ८३३ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ८० हजार ६९२ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर २३ हजार ३५४ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ६४७ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या