💥राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सी.बी.आय.चौकशीचा मार्ग मोकळा....!


💥मे.उच्च न्यायालयाने १५ दिवसांमध्ये सी.बी.आय.ने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते💥

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवत मे.सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन्ही आव्हान याचिका  फेटाळल्यावर मे.सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांच्याविरोधातील सी.बी.आय.ची प्राथमिक चौकशी करण्याच्या मे.उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला मे.उच्च न्यायालयाने १५ दिवसांमध्ये सी.बी.आय.ने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. 

त्यानुसार, सी.बी.आय.ने चौकशी सुरू केली आहे परमबीर सिंह व अनिल देशमुख हे दोघेही राज्य सरकार व प्रशासनामध्ये उच्च पदांवर कार्यरत होते दोघांनी मतभेद होण्यापूर्वी एकत्र काम केलेले आहे या प्रकरणातील उच्चपदस्थ आणि झालेले गंभीर आरोप पाहता स्वतंत्र चौकशी पाहिजे असे मे.सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले न्या.एस.के.कौल व न्या.हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर  दोन्ही याचिकांवर सुनावणी झाली.

 सी.बी.आय.ला दोन आठवड्यांची मुदत दिली असल्यामुळे आव्हान याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती अनिल देशमुखांच्या वतीने करण्यात आली होती राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांनी, अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याने बाहाय्य तपास यंत्रणेची (सी.बी.आय.) गरज नसल्याचा मुद्दा मांडला.अनिल  देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ अॅड. कपिल सिबल यांनी, देशमुखांचे म्हणणे न ऐकता मे.उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. 

त्यावर, सी.बी.आय.ला प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले गेले असून चौकशी करण्याने कोणती हानी होईल असा सवाल मे.न्यायालयाने सिबल यांना केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या