💥मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आग्रहामुळेच वाझेंची नियुक्ती.....!


💥अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह विभागाला दिलेल्या अहवालात नमूद केली💥

निलंबन रद्द करून सचिन वाझे यांना पोलीस दलात सामावून घेण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी घेतला असून त्यांच्या आग्रहामुळेच सह आयुक्तांना वाझेंची नियुक्ती गुन्हे शाखेतील गुन्हेगार गुप्तवार्ता कक्ष(सी.आय.यू.) या अत्यंत महत्त्वाच्या विभागात नाइलाजास्तव करावी लागली वाझे पदानुक्रम टाळून थेट सिंग यांना रिपोर्ट करत तसे सिंग यांचे तोंडी आदेश होते अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह विभागाला दिलेल्या अहवालात नमूद केली. 

गृह विभागाने वाझे यांच्या नियुक्तीसह अन्य मुद्द्यांवर माहिती सादर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले होते सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या वाझे यांच्याकडे सी.आय.यू.च्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यास तत्कालीन सह आयुक्तांनी कडाडून विरोध केला होता मात्र सिंग यांनी आग्रहाने वाझेंची नियुक्ती या विभागात करून घेतली तत्पूर्वी सिंग यांनी भविष्यात गुन्हे शाखेतील वरिष्ठ निरीक्षक, प्रभारी निरीक्षकांची बदली, नियुक्ती आयुक्तांच्या पूर्वसंमतीनेच केली जावी असे लेखी आदेश सह आयुक्तांना दिले. 

त्यामुळे वाझेंच्या नियुक्तीबाबत सह आयुक्तांचा नाइलाज झाला तसेच वाझेंची नियुक्ती करण्यापूर्वी या विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे आणि पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांची अन्यत्र बदली केली गेली असे या अहवालात नमूद  करण्यात आले आहे याबाबत तत्कालीन आयुक्त सिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही लघुसंदेशाद्वारे याविषयी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या