💥प्रसिद्धीपासून कोसो दूर राहात करोना महामारी मध्ये रुग्णसेवेसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व महेशजी कांकरिया....!


💥महामारी नंतरच्या निवडणुकांमध्ये भल्याभल्यां राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारे निकाल असतील ?💥

 काही लोक निवडून आल्यावर सुद्धा नाईलाज म्हणून आपला पक्ष व मतदार मायबाप यांच्या नजरेतून पडू नये म्हणून धडक प्रसिद्धीकरत समाजसेवेचा अंगरखा डगला घालून मायबाप जनतेच्या तथाकथित सेवेचा लेखाजोखा महामारी नंतरच्या निवडणुकांमध्ये भल्याभल्यां राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारे निकाल असतील ?

 परभणी जिल्ह्यात तर आता घराघरांमध्ये या महा रोगाचा प्रवेश झाल्याचे दिसते मायबाप जनता परभणीकर दोन हात करून त्यावर विजय मिळवत आहेत खंडीभर मदत केंद्र उघडून ठेवली आहेत. परंतु रुग्णांना अत्यावश्यक बाब म्हणून लागणारा  ऑक्सिजन मागणी व पुरवठा यामध्ये प्रचंड मोठे अंतर आहे.

बाकी जीवनदायी लागणाऱ्या इंजेक्शनच्या तुटवडा बद्दल न बोललेले बरे....हा घोळ जनतेच्या जीवाशी प्रचंड मोठा खेळ चालू आहे रुग्णांच्या नातेवाईकांना मध्ये याची प्रचंड नाराजी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आशेचा किरण म्हणून  जे  पुण्य आत्मे गोरगरीब वंचित उपेक्षित ज्यांना राजकीय पाठिंबा नाही. प्रचंड मोठे आर्थिक बळ नाही.

संकटाच्या समयी जेव्हा माणसाच्या पाठी मागे कोणी उभा नसतो ना त्यालाच कळते ज्याचे घर जळते आपल्या नात्यातल्या रुग्णाला वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे छाती फुटेपर्यंत नातेवाईक या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फिरत असतात अशा कठीण प्रसंगी हवा असतो तो मायेचा आपुलकीचा व मी तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका असे म्हणणाऱ्या एका समाजसेवकाचा हात आणि हाच मायेचा बोलावा असलेला हात त्या गरजू रुग्णाचा जीव वाचवून त्या कुटुंबाचा आधारवड जिवंत राहण्यासाठी मदत होते.

आदरणीय महेशराव कांकरिया जी  आपण वयाने माझ्यापेक्षा खुप लहान आहात परंतु संस्काराने व सेवाभावी वृत्तीने माझ्यापेक्षा मोठे आहात हा अनुभव माझ्या केसमध्ये मी घेतला आहे माणसं वयानं मोठी नसून ती कर्तृत्वानं मोठी असली  तर त्या मातीच जन्मदात्या माता-पित्याचे ऋण फेडले सारखं होतं आपला वाढदिवस असल्याचं व्हाट्सअप फेसबुकवरून कळालं आपण मला परभणी मध्ये 15 मार्च या निर्णायक दिवशी संपूर्ण दिवस ची धडपड केली .ती मी डोळ्याने पाहिले आहे...

 ईश्वर प्रत्येकाला काही ना काही गुण देतो परंतु मोजक्याच लोकांना तो सर्वगुणसंपन्न तयार करतो...आपण ईश्वर निर्मित सर्वगुणसंपन्न आहात... आपल्या हातून अशीच रुग्ण सेवा घडो...सोन्या बद्दल काय यावे सोन्या चीज कसोटी होते हे मात्र नक्की...मला ज्या दिवशी तुम्ही ऍडमिट केले त्या दिवशी स्वतः  करोना लस घेऊन आल्याचे कळले गरजू रुग्णांसाठी आपला जीव गहाण ठेवण्याची वृत्ती ही संस्कारातून येत असावी असे मला वाटते खरे तर आपल्या जन्मदात्या माता-पित्यांना सुद्धा मी साष्टांग दंडवत घालतो.

 कारण त्यांनी तुमच्यासारख्या कर्तुत्ववान समाजहित उपयोगी माणूस व मानव धर्मासाठी सर्वस्व झोकून देत असताना प्रसिद्धीच्या नाटकापासून दूर  राहणे आजच्या काळी इतके सोपे काम नव्हे परभणीच्या मातीचा सुगंध आपल्या सेवेतून असाच दरवळत राहो...ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो...पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपला सदैव  ऋण मानणारा सर्वसामान्य माणूस म्हणून हा शुभेच्छाचा लेख लिहिला...

 - सतीश सातोनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या