💥उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा झालेल्या बोराळे गावात निघाले ८ कोरोना पॉझिटिव्ह...!

 


💥निवडणूक सभांमध्ये काेराेना नियमांची पायमल्ली; मंगळवेढ्यात काेराेना रूग्ण वाढत आसल्याचे चित्र💥

पंढरपूर /प्रतिनिधी

कोरोनाचे संकट जोमात असताना निवडणूक आयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर केली आणि प्रचारासाठी मंत्र्यांच्या होऊ लागलेल्या मोठं मोठ्या सभेमुळे होत असलेल्या गर्दीत करोना वाढू लागल्याचे समोर आले आहे. गेले दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर आणि मंगळवेढा भागात जोरदार सभा झाल्या. दादांना ऐकायला मतदारांनीही कोरोनाचे नियम पायदळी तुडवत गर्दी केली. याच पद्धतीने भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, राम शिंदे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याही जोरदार सभा झाल्याने गर्दी होताच आहे. या राजकीय नेत्यांच्या सभांमुळे आता कोरोना वाढू लागल्याचे धक्कादायक चित्र समोर येऊ लागले आहे. मंगळवेढ्यात शुक्रवारी ४२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह सापडले असून ज्या गावात अजितदादांची सभा झाली त्या बोराळे गावात ८ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. असेच धक्कादायक चित्र पंढरपूरचे असून शुक्रवारी तब्बल १५१ नवीन करोना रुग्ण पंढरपूर मध्ये सापडले असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५८६ पर्यंत गेल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. येत्या १२ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा व पंढरपुरात ६ सभा होणार असून दोन्ही पक्षांचे स्टार प्रचारक १५ एप्रिलपर्यंत सभा घेणार असल्याने करोनाचा फैलाव रोखायचा कसा हा खरा प्रश्न आहे. अजून म्हणावे तशी कोरोना तपासणी होत नसून ज्याला त्रास होतोय अशाच रुग्णांची तपासणी होत आहे. यातून हे वाढते आकडे धडकी भरवणारे असल्याने आता निवडणूक आयोगाने एकतर निवडणूक पुढे ढकलावी अन्यथा या गर्दीवर कठोर उपाययोजना करावी एवढीच अपेक्षा मतदार करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या