💥महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार समस्त मानव जातीसाठी दिशादर्शक आहेत.....!


💥मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.डॉ.व्‍यंकट कदम यांचे प्रतिपादन💥

पूर्णा (दि.१२ एप्रिल) - भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा च्या वतीने बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक के. पी. रणवीर प्रमुख व्याख्याते मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालया चे प्रा.डॉ. व्यंकटराव कदम हे होते. प्रमुख पाहुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल चे जेष्ठ शिक्षक सुप्रिसद्ध समाजसेवक रौफ कुरेशी यांची उपस्थिती होती.


विचारमंच वर जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो भंते बोधिधममा,भंते प यावंश भंते संघ रत्न मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे, नगरसेवक मधुकर गायकवाड, एडवोकेट धम्मदिप जामखेड एडवोकेट धम्मदीप जोंधळे, एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड वा .रा काळे गुरुजी टी झेड कांबळे अमृतराव मोरे पत्रकार विजय बगाटे गौतम वाघमारे शिवाजी थोरात  मुगा जी खंदारे दिलीप गायकवाड मुजाजी गायकवाड बाबाराव वाघमारे श्रावण येनगडे ह्यांची उपस्थिती होती.

प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर व्यंकटराव कदम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर यथोचित प्रकाश टाकतांना सांगितले महात्मा ज्योतिबा फुले व  सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने तत्कालीन रूढी परंपरा यांना झुगारून शूद्र अतिशूद्र व स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. मनुवादी व्यवस्थेला झुगारून त्यांनी सामाजिक सुधारणा केल्या.


समस्त मानवजातीसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य दिशादर्शक आहे. आपल्या प्रास्ताविक भाषणा मध्ये सु प्रसिद्ध आंबेडकरी विचार वंत प्रकाश कांबळे यांनी महापुरुष व समाजसुधारकांचा वारसा समाजाने पुढे नेला पाहिजे यामध्ये समाजाचे व देशाचे हित आहे 

प्रमुख पाहुणे रौफ कुरेशी यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत असलेली शिक्षण व्यवस्था त्या देशांमध्ये निर्माण झाली पाहिजे.

भदंत डॉक्टर गुप्त महादेव यांनी देशातील थोर समाज सुधारक पेरियार  कबीर संत गाडगे महाराज तुकडोजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग सांगुण उपस्थितांना अंतर्मुख केले. हे महापुरुष समाज सुधारक फारसे शिकले नव्हते त्यांच्या नावावर आज विद्यापीठे आहेत.

कार्यक्रमाचे चे सूत्र संचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल गवळी, अमृत वाघमारे किशोर ढकर गे वमंडळाचे सचिव संजय वाघमारे उपाध्यक्ष राजक कुमार सूर्यवंशी, प्रकाश खरे, राहुल पुंडगे,  सुभाष पांडव विर,शिंदे, शेख नसीर व जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये कोरोणाची पार्श्वभूमी लक्षात घेता मास्क  सॅनिटायझर फिजिकल डिस्टन्स चे पालन करण्यात आले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या