💥परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भावाने संपूर्ण जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक....!


💥जिल्ह्यात कोरोना लसीचा साठा संपुष्टात; जोवर लस उपलब्ध होत नाही तोवर अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागणार💥

परभणी (दि.९ एप्रिल) ः परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भावाने दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत असतांनाच दुसरीकडे कोरोनावरील प्रभावी ठरणार्‍या कोरोना प्रतिबंधक लसीचा साठाच संपुष्टात आला आहे.

जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असे म्हटले आहे की आपण कोरोना प्रतिबंधक लसीच्या साठ्याबाबत मागणी केलेली आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू केला आहे. तो साठा लवकर उपलब्ध होईल अशी आशा आहे, असे म्हटले. जिल्ह्याकरिता एक लाख चार हजार डोस प्राप्त झाले होते. त्यात ७६ हजार कोविशील्ड व २८ हजार कोव्हॅक्सीनच्या लसीचा समावेश होता, असे नमूद करीत जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी आज शुक्रवारी जवळपास ४३० डोस शहरात उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर लस घेणार्‍यांचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील करोना लसचा साठा संपुष्टात आला असून जोवर लस उपलब्ध होत नाहीत तोवर अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत परभणी जिल्ह्यात एकूण ५३ केंद्रावर करोनाची लस दिली जात आहे. दररोज साधारणपणे ५००० व्यक्तींना ही लस दिली जाते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या