💥छत्तीसगड नक्षलवादी हल्ला; बेपत्ता कोब्रा कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात ?


💥नक्षलवाद्यांनी दोन स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे💥 

कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यापासून बेपत्ता आहेत बेपत्ता कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आहे अशात बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात आहे असा दावा नक्षलवाद्यांनी केल्याचं समजतंय ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांनी दोन स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. 

बिजापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश मिश्रा आणि पत्रकार राजा राठोड यांना फोन करुन नक्षलवाद्यांनी बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला याबाबत बिजापूरचे पोलिस अधीक्षक कामलोचन कश्यप यांनी सुरूवातीला माध्यमांशी बोलताना नक्षलवाद्यांकडून फोन आल्याच्या वृत्ताचं खंडन केलं पण नंतर पत्रकारांना फोन आल्याचं सांगितल्यावर त्यांनी, “हो जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असू शकतो कारण सुरक्षा दलाने घटनेनंतर जवळच्या पाच-सहा किलोमीटरच्या परीसरात त्याचा बराच शोध घेतला होता पण त्यांना यश आलं नाही”अशी प्रतिक्रिया दिली. 

“जवानाला शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, आम्ही फोन कॉल्सचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत”अशी माहिती एस.पी.कश्यप यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या