💥प्रशासनातील संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलिसांमध्ये अजून किती वाझे आहेत याचा शोध घ्या…!


💥भारतीय जजता पार्टीचा नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना टोला💥

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मे.मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला देशमुख यांच्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्री पदाची सूत्रं हाती घेतली यावेळी बोलताना त्यांनी ‘पोलीस प्रशासनातील संघनिष्ठ अधिकाऱ्यांचा शोध घेऊ' असं म्हटलं होतं त्यावरून भा.ज.पा.ने नव्या गृहमंत्र्यांना सल्ला देत टोला लगावला आहे.

 गृहमंत्री मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या विधानावर भा.ज.पा.चे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे मुंबईतील भा.ज.पा.च्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गृहमंत्र्यांना खोचक सल्ला दिला राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी  गृहखात्याचा पदभार स्वीकारला त्यांना शुभेच्छा पण पदभार घेतल्यानंतर पोलिसांमध्ये आणि प्रशासनामध्ये संघनिष्ठ अधिकारी कोण आहेत ? याची तपासणी आम्ही करणार आहोत असं ते म्हणाले. 

संघ देश प्रेम शिकवतो त्यामुळे अशा संघनिष्ठ अधिकाऱ्यांना शोधण्याऐवजी आपण पोलिसांमध्ये अजून किती वाझे आहेत  सरकारच्या विविध खात्यात भ्रष्ट व्यवहार करणारे जे ‘वाझे’ अद्याप दडलेले आहेत त्यांना शोधून काढावे ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे असा टोला उपाध्ये यांनी लगावला यांनी पोलीस खात्यात संघनिष्ठ अधिकारी कोण आहेत याची तपासणी करू असं वक्तव्य केलं. 

आम्ही गृहमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की, संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यात आणखी किती वाझे आहेत याचा शोध घ्यावा ते राज्यासाठी अधिक फायद्याचे असेल....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या