💥श्रद्धांजली : दिवंगत मनसे नेते प्रकाश कौडगे कुशल संघटक होते : रवींद्रसिंघ मोदी


💥प्रकाशजी कौडगे यांचा सारखा तडफदार व्यक्तिमत्व आज आपण गमावला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💥

नांदेड ; नांदेड जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या संघटन कार्यात दिवंगत प्रकाश कौडगे यांचा योगदान संस्मरणीय आहे. साधारण कुटुंबातुन पुढे येऊन त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले होते. लिंगायत समजातर्फे एकेकाळी ते विकल्प म्हणून चर्चेत होते. महानगर पालिका, विधानसभा निवडणुकावेळी ते अनेकदा स्वतः फोन करून बातम्या द्यायचे. त्यांनी शीख समाजात संघटन कार्य विस्तारित करीत असंख्य शिवसैनिक तयार केले होते. खालसा हायस्कूल मध्ये त्यांचे मैट्रिक पर्यंत शिक्षण झाले म्हणून शीख समाजात त्यांचे असंख्य मित्र होते. अनेक वेळा येथील धार्मिक परिस्थिती बाबत ते चर्चा करायचे आणि त्या नंतरच निर्णय घ्यायचे. राजकारणात अनेकवेळी त्यांनी चढउतार पहिला आणि शेवटी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झाले. नियतीने त्यांना पुन्हा सावरण्याची संधी दिली नाही याचे दुःख होत आहे. प्रकाश जी कौडगे यांचा सारखा तडफदार व्यक्तिमत्व आज आपण गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करीत आहे....


- रवींद्रसिंघ मोदी, नांदेड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या