💥औरंगाबाद रेल्वे सुरक्षा बलाची धाडसी कारवाई ; रेल्वे आरक्षण तिकीटाचा काळा बाजार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट केले उघड....!


💥रेल्वे सुरक्षा बलाचे धाडसी अधिकारी अरविंद शर्मा व सहकारी कर्मचाऱ्यांचे रेल्वे प्रवासी सेनेने केले अभिनंदन 💥 

औरंगाबाद (दि.२५ एप्रिल) - औरंगाबाद रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि.२३ एप्रिल ते २५ एप्रिल २०२१ दरम्मयान कन्नड पोस्ट ऑफिस मधून रेल्वे तिकीट आरक्षण प्रणालीची लिंक चोरून रेल्वेचे आरक्षित तिकीट बनवून विक्री करणाऱ्यांचे एक रॅकेट उघडकीस आणले असून यात आरोपी मुद्दे माला सह रंगेहाथ पकडण्यात आले आहेत.

या प्रकरणातील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन औरंगाबाद येथे आणण्यात आले आहे ही कार्यवाही नांदेड रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत अचूक व गोपनीय ठेवत रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा व सहकरी पथकातील कर्मचाऱ्यांंनी पार पाडली असून रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष श्री.संतोष सोमानी यांनी अभिनंदन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या