💥पुर्णेतील भदंत उपाली थेरो नगर बुद्ध विहार परिसरातील ज्येष्ठ धम्म उपासिका तुळसाबाई बगाटे यांचे दुःखद निधन....!


💥हिंगोली येथील पोस्टमास्टर रमेश बगाटे यांच्या त्या मातोश्री होत💥

पूर्णा (दि.२ एप्रिल) - शहरातील भदंत उपाली थेरो नगर बुद्ध विहार परिसरातील ज्येष्ठ धम्म उपासिका तुळसाबाई बगाटे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी देविदास बगाटे यांच्या त्या पत्नी होत्या. हिंगोली येथील पोस्टमास्टर रमेश बगाटे यांच्या त्या मातोश्री व जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष गौतम कुलदीपक यांच्या त्या सासू होत्या.

भदंत पयावंश यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णा येथील बौध्द स्मशान भूमी मध्ये  आज शुक्रवार दि.२ एप्रिल रोजी दिवशी सकाळी ११-०० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कोविड च्या पार्श्वभूमीवर पुरेशी खबरदारी घेऊन शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या