💥राज्यभरात शुक्रवारी रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी मुळे रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट....!


💥मुंबईतील सर्वच मुख्य रस्त्यांवर पोलीस प्रशासनाने कडक नाकाबंदी केली होती💥 

मुंबई : राज्यभरात शुक्रवारी रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे शनिवार काटेकोर पालन होताना दिसले दोन दिवस कठोर निर्बंध असल्याने नागरिकांनी शुक्रवारीच खरेदी केली होती त्यामुळे रस्ते, बाजारपेठांमध्ये शनिवारी शुकशुकाट होता सायंकाळी मात्र वातावरण काहीसे शिथिल होताना दिसले दोन दिवस संचारबंदीमुळे सर्वच दुकाने बंद राहतील. 

असे सांगण्यात आल्याने नागरिकांनी शुक्रवारीच स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती त्यामुळे काल शनिवारी अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले परिणामी अत्यावश्यक सेवांतर्गत परवानगी देण्यात आलेली किराणा सामान, भाजीपाला, फळे, मांसविक्री करणारी दुकाने, डेअरी सुरू करण्यात आली असली तरीही ग्राहक फिरकले नाहीत मुंबईतील सर्वच मुख्य रस्त्यांवर पोलीस प्रशासनाने कडक नाकाबंदी केली होती छोटे रस्ते,नाके,बाजारपेठा आदी ठिकाणी गस्त असल्यामुळे नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले सायंकाळी ५ नंतर रस्त्यावर काहीशी वर्दळ सुरू झाली... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या