💥दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; रेड्डींना वाचवण्यासाठी चौकशी समितीचा फार्स..!


💥किरकोळ चौकशी करून वनबलप्रमुख त्यांची जबाबदारी झटकत असल्याची टीका आता होत आहे💥

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी पोलीस खाते करीत असताना या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीची मागणी राज्याच्या वनबल प्रमुखांकडे करण्यात आली मात्र या मागणीला बगल देत त्यांनी आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली रेड्डींना वाचवण्यासाठी हा चौकशी समितीचा फार्स रचला जात असून महिला आयोगाने अहवाल मागितला म्हणून किरकोळ चौकशी करून वनबलप्रमुख त्यांची जबाबदारी झटकत असल्याची टीका आता होत आहे. 

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात दीपालीने ज्या गोष्टी नमूद केल्या, त्याची चौकशी पोलीस करीत आहेत त्यामुळे या प्रकरणातील निलंबित उपवनसंरक्षक शिवकुमार व निलंबित क्षेत्र संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या विभागीय चौकशीची मागणी महाराष्ट्र वनसेवेतील अधिकारी तसेच संघटनेने केली होती ही मागणी वनबलप्रमुखांकडून धुडकावून लावण्यात आली आणि त्याच विषयाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली या समितीतील एक-दोन सदस्य वगळता इतर सदस्य या प्रकरणाशी संबंधित असल्याने ही समिती म्हणजे धूळफेकीचा प्रकार असल्याची टीका होत आहे. 

समितीला अहवाल देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे हा दीर्घ कालावधी प्रकरण दडपण्यासाठीच असल्याची टीका होत असून या समितीला नेमके  अधिकार काय ? हे देखील स्पष्ट नाही समितीचे सदस्य हे विभागातीलच अधिकारी आहेत त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच चौकशी समितीचा हा देखावा आहे का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या