💥हिंगोली जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा कमी पडू देणार नाही - खासदार हेमंत पाटील


💥जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीवर खा.पाटील यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेसह कार्यतत्परतेची सर्वत्र चर्चा होत आहे💥

✍️शिवशंकर निरगुडे - हिंगोली

हिंगोली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याला ऑक्सिजन चा कमी पडूदेणार नाही अशी ग्वाही खासदार हेमंत पाटील यांनी दिली . याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी रायगड आणि चाकण येथे १० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा आरक्षित करून ठेवण्यात आला आहे.  हिंगोली जिल्ह्यासाठी अद्यापपर्यंत कुठेही ऑक्सिजन साठा राखीव करून ठेवण्यात आला नव्हता खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्ननाने साथ राखीव करून ठेवण्यात आला हे विशेष


 देशात आणि राज्यात कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र प्रशासनाची कोरोना परिस्थती विस्कटल्यानंतर खासदार हेमंत पटली यांनी तातडीने सर्व सूत्रे हाती घेतली आणि योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी तातडीने  जिल्ह्यातील आजी-माजी  आमदारांची बैठक बोलावाली या बैठकीला आ. संतोष बांगर, आ. तानाजी मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे, माजी आ. रामराव वडकुते, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी , निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार , जिल्हा नगररचना अधिकारी रामदास पाटील उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे यांची उपस्थिती होती .  या बैठकीत  त्यांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या  परिस्थितीच्या दृष्टीने अनेक मुद्दे मांडले . हिंगोली जिल्ह्याकरिता  ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शन   साठा आरक्षित करून ठेवण्यात आला नव्हता.  ऑक्सिजन पुरवठ्याबाबत  मुंबई येथे नुकतीच राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह यांच्यासोबत  झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी रायगड येथील  जेएसडब्लू कंपनीत  ५ मेट्रिक टन आणि चाकण येथील आयनॉक्स कंपनीत  ५ मेट्रिक टन असा एकूण १० मेट्रिक टन साठा आरक्षित करून ठेवण्याबाबत चर्चा झाली आणि यास तात्काळ मंजुरी देण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर वसमत,  कळमनुरी  येथे 5 KL,औंढा आणि  सेनगाव येथे 2 KL तर हिंगोली जिल्हा रुग्णालयात १३  KL क्षमतेचे ऑक्सीजन  टँक बसवण्या करिता  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून मंजुर मिळाली आहे,  लवकरच हे प्लांट कार्यान्वित करण्यात येणार आहेत.    तसेच जिल्ह्याला कोणत्याही क्षणी ऑक्सिजनचा साठा लागू शकतो त्यामुळे तातडीने साठा पाठवून देण्यासाठी आणि वाहतूक करण्यासाठी वाहतूकदार उपलब्ध नसल्याने याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे  ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्याकरिता संपर्क साधला होता यावर परिवहन मंत्र्यांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन  दिले .  कोरोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावात जिल्ह्यात तयार झालेल्या गंभीर परिस्थितीवर खासदार हेमंत पाटील यांनी घेतलेली कणखर भूमिका आणि कार्य तत्परतेची सर्वत्र चर्चा होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या