💥पुर्णेचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांच्या सरकारी गाडीला अपघात...!


💥उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या अभियंत्यासह कंत्राटदाराविरोधात दिली तक्रार💥 

पूर्णा (दि.३ एप्रिल) - येथील प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड सहकारी कर्मचाऱ्यासह शासकीय वाहनाने रात्रीच्या गस्तीसाठी निघाले असता त्यांच्या वाहनास तालुक्यातील नऱ्हापुर येथे आज शनिवार दि.३ एप्रिल २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात श्री.राठोड यांच्यासह एका सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांस जबर मार लागला आहे. या प्रकरणी स्वता उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या बेजवाबदार अभियंत्यासह कंत्राटदाराविरोधात तक्रार दिली आहे.


पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले जिल्ह्यातील जेष्ठ अधिकारी सुभाष राठोड यांच्याकडे पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी पूर्णा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून अतिरीक्त प्रभार दिला आहे. श्री. राठोड हे गुरुवारी रात्री जिल्हा चेकिंग ड्युटी करत होते त्यावेळी ते पूर्णा ते चुडावा रस्त्यावरून नर्‍हापूर नालापुलाजवळून जात होते. त्यावेळी तेथे पुलाचे काम चालू असल्याने त्या कामाजवळ ठेकेदार अभियंत्यासह सुपरवायझर यांनी पुलाचे काम चालू आहे, उडवीकडे वळा असा दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही. किंवा रस्त्यावर दगडेही लावलेली नाहीत. त्यामुळे श्री.राठोड हे बिनदिक्कत तेथून जात असताना त्यांना नेमके रस्ता लक्षात आला नाही शिवाय समोरून येणार्‍या वाहनाचा उजेड चमकल्यामुळे राठोड यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्यांची सरकारी जीप क्र. एमएच १२ पीटी ५७१२ नादुरूस्त असलेल्या पुलाजवळ आदळली. यात जीपचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असून आपल्यासह गाडीतील कर्मचारीही जखमी झाला असल्याचे त्यांनी चुडावा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार श्री.पंडीत हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या