💥परभणीत कोरोना बाधित रुग्णांच्या अनावश्यक रक्ततपासण्या करून रुग्णांची आर्थिक लूट...!


💥याबाबत कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे💥

परभणी (दि.१२ एप्रिल) - जिल्हा भरात कोरोना संसर्गाचा हाहाकार पसरला असताना भांबावलेल्या बाधित रुग्णांना कोरोना तपासणीनंतर रक्त तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्‍टर देत असून "कोव्हिडं प्रोफाइल" च्या नावाखाली खाजगी पॅथॉलॉजी लॅब बाधित रुग्णांची सर्रास लूट करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला  शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा कितीतरी पट खर्च लागत असल्याने बाधित रुग्णांची अक्षरशः लूट होत आहे याबाबत कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे


अधिक माहिती अशी की परभणी जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे व यातच बाधित रुग्णांचा ओढा खासगी रुग्णालयांकडे असून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे प्रत्येक रुग्णांना रक्त तपासणीचा सल्ला देण्यात येतो व या संधीचा फायदा घेत परभणी शहरातील अनेक नामवंत पेथॉलॉजी लॅब चालकांनी कोव्हिडं प्रोफाइल हे गोंडस नाव तयार करून त्यामध्ये अनावश्यक असलेल्या रक्ताच्या तपासण्या करण्याचं षड्यंत्र रचले आहे यातून एच आय व्ही लिवर फंक्शन आदी प्रकारच्या कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक नअसलेल्या रक्त तपासण्या या प्रोफाईल मध्ये समाविष्ट केल्या आहेत व या प्रोफाईल ची किंमत फुगून टाकली असून वास्तविक शासनाच्या निर्धारित दराच्या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या रक्ततपासणी चे नमुने रुपये सहाशे घेऊन तपासणी करून द्यावेत असे परिपत्रक ऑगस्ट २०२० मध्ये काढून संबंधितांना बंधनकारक केले असतानाही त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दराने म्हणजे  कोव्हिडं प्रोफाइल साठी सुमारे 4100 रुपये दर शहरातील प्रणव पेथॉलिलॉजी लॅब कडून आकारण्यात आला आहे यामुळे साडेतीन हजार रुपये प्रत्येक रुग्णाची अनावश्यक तपासणी करून लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी एका बाधित रुग्णांच्या तपासणीचा अहवाल एका लेखी पत्राद्वारे ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त सदस्य प्रदीप कोकडवार यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना थेट लेखी तक्रार देऊन कळविला आहे त्यांच्या परिचयाच्या दोन व्यक्ती कडून कोव्हिडं प्रोफाईल च्या नावाखाली आठ हजार दोनशे रुपये घेतले ची पावती त्यांनी लावली आहे वास्तविक शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये तपासणी होणे आवश्यक असताना आणि हा संसर्ग सार्वजनिकरीत्या आकस्मिक उभा राहिल्याने निर्माण झालेली परिस्थिती सर्वत्र फार चिंताग्रस्त असताना पॅथॉलॉजी लॅब  मात्र आपलं उखळ पांढरं करून घेण्याच्या नादामध्ये माणुसकीही विसरल्याचा प्रकार समोर आला आहे यापूर्वी त्यांनी दिलेली पोरवाल डायग्नोस्टिक सिटी स्कॅन सेंटर यांच्याविरुद्ध ची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित असून या तक्रारीच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशामुळे परभणीत तीन हजार रुपये घेऊन आता सिटीस्कॅन केला जात आहे आता जिल्हा शल्य चिकित्सक कधी कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या