💥जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सकाळी ३ दहशतवाद्यांचा खात्मा...!


💥जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणावर स्फोटकं व शस्त्रसाठा देखील हस्तगत केला आहे💥 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सकाळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं ही चकमक पुलवामामधील काकापोरा भागात झाली सुत्रांच्या माहितीनुसार,दहशतवादी स्थानिक होते आणि एका तीन मजली इमरतीत दडून बसलेले होते जवानांनी स्फोटकांद्वारे ही इमारत उडवली. 

ज्यांनतर या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणावर स्फोटकं व शस्त्रसाठा देखील हस्तगत केला आहे तर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरीक देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमी नागरिकांना ताताडीने स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या