💥करोना काळात गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक......!


💥संपूर्ण आरोग्य यंत्रणा करोना रुग्णोपचारात गुंतल्यामुळे गर्भवती महिलांचे जास्त मृत्यू💥

करोनाच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे गर्भवती महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली तसेच जन्मत: अर्भक मृत असण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून आले आहे ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखातून ही बाब स्पष्ट झाली असून प्रामुख्याने भारतासह विकसनशील देशात गर्भवती महिलांचे करोना काळातील मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे लॅन्सेट’मधील प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे महाराष्ट्रातही संपूर्ण आरोग्य यंत्रणा करोना रुग्णोपचारात गुंतल्यामुळे गर्भवती महिलांचे जास्त मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले एकूण १७ देशात ४० अभ्यासगटांनी याबाबत गोळा केलेल्या तपशीलातून करोना काळातील गर्भवती महिलांचे करोना काळातील जास्त मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून  लॅन्सेट मधून ही बाब प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

करोनाबाधित गर्भवती महिला तसेच वेगवेगळ्या संसर्गाने आजारी असलेल्या महिला त्यांचे मानसिक स्वास्थ्य तसेच त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यात आलेले अडथळे या सर्वांचा विचार या अभ्यासात करण्यात आला आहे १७ देशातील जवळपास सहा लाख गर्भवती महिलांची माहिती घेऊन तपशीलवार छाननी करण्यात आली यात अभ्यासकांना प्रामुख्याने अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशात आरोग्य व्यवस्थेत करोनामुळे निर्माण झालेल्या उपचारातील अडचणी तसेच संसर्गाच्या भीतीमुळे अनेक गर्भवती महिलांचे तसेच अर्भक जन्मत: मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. जवळपास बाराहून अधिक अभ्यासात जन्मताच अर्भक मरण पावल्याच्या प्रमाणात २८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले, 

तर गर्भवती असताना तसेच बाळंतपणाच्या काळात मेक्सिको व भारतात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या