💥छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद...!


💥नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात पाच पोलीस शहीद झाले तर १४ जण जखमी झाले होते💥

छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून दहा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे छत्तीसगडचे डिजीपी. डि.एम.अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे शहीद जवानांमध्ये डी.आर.जी. व सी.आर.पी.एफ.च्या जवानांचा समावेश आहे या अगदोर छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात  नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात पाच पोलीस शहीद झाले तर १४ जण जखमी झाले होते. 

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच पोलीस शहीद जिल्हा राखीव पोलीस दलातील २० कर्मचारी मंगळवारी नक्षलवादविरोधी मोहीम आटोपून खास बसद्वारे नारायणपूरकडे परतत होते कदेनार आणि कान्हरगावदरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटाद्वारे ही बस उडवली. घटनेत चालकाबरोबरच पाच पोलीस शहीद झाले अशी माहिती पोलीस महानिरीक्षक (बस्तर परिमंडळ) सुंदरराज पी.यांनी दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या