💥परभणी जिल्ह्यात आज रविवारी ८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचरा दरम्यान मृत्यू...!


💥जिल्ह्यात आज रविवारी आढळले तब्बल ५२२ कोरोनाबाधित रुग्ण💥

परभणी (दि.०४ एप्रिल) - परभणी जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे ही प्रमाण वाढतांना दिसत आहे जिल्ह्यात एकंदर कोरोना महामारीने हाहाकार माजवला असतांना मात्र जिल्ह्यातील नागरिक प्रशासकीय निर्देशांचे अद्यापही गांभीर्याने पालन करतांना दिसत नसल्याचे निदर्शनास येत आहे.जिल्ह्यात आज रविवार दि.४ एप्रिल २०२१ रोजी तब्बल ५२२  कोरोनाबाधीत आढळल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही हादरल्याचे दिसत असून जिल्ह्यात आज रविवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान ८ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.तर रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ३४१ कोरोनामुक्त व्यक्तींना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ३ हजार ५  रुग्ण उपचार घेत आहेत.तर जिल्ह्यात आजपर्यंत ४४३ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत १६ हजार २७३ कोरोनाबाधित  आढळल्या आहेत. त्यापैकी १२ हजार ८२५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ८० हजार ४०१ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ६३ हजार ५१५ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आहेत.तर १६ हजार १२५ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ५९४ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या