💥परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात झपाटयाने वाढणाऱ्या कोवीड संक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी मोहीम राबवा...!


💥गाव पातवळीवर आरटीपीसीआर टेस्ट वैद्यकीय सुविधा व विलगीकरण कक्ष उपलब्ध करुन द्या - प्रहार जनशक्ती पक्ष

परभणी (दि.२६ एप्रिल) - जिल्हयातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठया प्रमाणावर कावीडचे रुग्ण सापडत आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये कोवीडची आर. टी.पी.सी.आर. चाचणी करण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरीक घरगुती उपचार तसेच सर्दी खोकल्याचे औषधी घेऊन स्वतः उपचार करीत आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे. सामान्यपणे दिसणारी लक्षणे पण कोवीडचे लक्षणे असू शकतात अशा प्रकारच्या आजारावर दुर्लक्ष करुन बिनधास्तपणे गावभर फिरणारे रुग्ण ग्रामीण भागातील वाढत्या कोवीड संक्रमणाचे मुख्य कारण आहे. आजार वाढल्यावर अगदी शेवटच्या क्षणाला हे रुग्ण जिल्हाच्या दिशेने धाव घेतात तोपर्यंत वेळ निघुन गेलेली असते. अशा वेळी त्यांचा जिव धोक्यात असतो. कोवीडच्या या रुग्णांना संक्रमणाच्या पहिल्या टप्यावरच उपचार मिळाले तर संक्रमण आटोक्यात येईल व आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येणार नाही.

ग्रामीण भागातील वाढत्या कोविड संक्रमणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तत्काळ ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करावी या मागणी साठी आज दि.२६ एप्रिल २०२१ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह श्री दिपक मूगळीकर जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेऊन त्यांना ग्रामीण आरोग्य बाबत मागण्यांचे निवेदन सादर केले.

 जिल्हामध्ये आम्ही रुग्णसेवक म्हणून काम करीत असतांना या गंभीर गोष्टी आमच्या निदर्शनास येत आहेत. करिता जिल्हा प्रशासनाने परभणी जिल्हयातील ग्रामीण भागात सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक , शिक्षक , आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस व स्थानिक आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावात सक्तीची कोवीडची चाचणी ( आर.टी.पी.सी.आर.तपासणी ) करावी व जे नागरीक काविड पॉझिटिव्ह सापडतील परंतू त्यांना सौम्यलक्षण आहे आशा रुग्णांची व्यवस्था त्या त्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विलगीकरण कक्ष उभारुन करावी तसेच ज्या कोवीड रुग्णांना कोवीड संक्रमण मोठया प्रमाणावर झाले आहे त्याना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्यावी. असे केल्याने जिल्हयामध्ये चोरपावल्यानी ग्रामीण भागामध्ये शिरकाव केलल्या कोवीड संक्रमणाला आळा बसेल व त्याचा उद्रेक होणार नाही. जर ग्रामीण भागातील कोवीड संक्रमणाचा उद्रेक झाला तर जिल्हयातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल व हे संक्रमण रोखण व सामान्य जनतेचे प्राण वाचवणे आवघड होऊन बसेल असे ही या निवेदनात म्हंटले आहे या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, उपजिल्हा प्रमुख भास्कर तारे, परभणी शहर प्रमुख पिंटू कदम, मानवत तालुका प्रमुख गोविंद मगर, पाथरी तालुका प्रमुख युवराज राठोड ई. च्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या