💥उबर कंपनीला एका अंध महिला प्रवाशासोबत भेदभाव केल्याबद्दल ८ कोटी रुपयांचा दंड...!


💥अमेरिकेतील एका लवादाचा ‘उबर’ ला दणका💥

 अमेरिकेतील एका लवादाने दिलेल्या निर्णयामध्ये मोबाइल अ‍ॅपआधारित खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर कंपनीला एका अंध महिला प्रवाशासोबत भेदभाव केल्याबद्दल १.१ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळजळ आठ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे ही सर्व रक्कम या महिलेला देण्याचे आदेश लवादाने दिलेत या महिलेने कंपनीच्या अ‍ॅप वापरुन गाडी बूक करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला तब्बल १४ चालकांनी नकार दिल्याने तिने आपल्यासोबत कंपनी भेदभाव करत असल्याचा आरोप करत याचिका दाखल केली.

 या सुनावणीदरम्यान उबरने चालकांकडून केल्या जाणाऱ्या भेदभावासाठी कंपनी जबाबदार नसल्याचं सांगताना उबर चालक हे कंत्राट पद्धतीवर काम करतात असा मुद्दा उपस्थित केला मात्र हा मुद्दा लवादाने या प्रकरणामध्ये ग्राह्य धरला नाही या निकालाबद्दल उबरने नाराजी व्यक्त केलीय सॅन फ्रॅन्सिस्को येथे राहणाऱ्या लिसा लिर्विंग यांच्यासोबत उबरने भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आलाय लिसा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आपण अंध असून बेर्णी नावाच्या आपल्या कुत्रीच्या मदतीने भटकंती करत असल्याचं सांगितलं. 

मात्र २०१८ साली उबर चालकांनी त्यांना सेवा देण्यास नाकारलं लिसा यांना अनेक चालकांनी नकार दिला तर काहींनी त्यांची दृष्टी बनून सोबत राहणाऱ्या बेर्णी या कुत्रीसोबत टॅक्सीने घेऊन जाण्यास नकार दिल्याचं याचिकेत म्हटलं आहे उबर चालकांनी या महिलेला रात्री अर्ध्या वाटेत सोडल्याने या महिलेला ऑफिसला जाण्यास उशीर झाला त्यामुळे या महिलेला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं तर इतर दोन वेळी या महिलेचा उबर चालकांनी अपमान केला इतकचे नाही तर या महिलेने यासंदर्भात कंपनीकडे तक्रार केली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या