💥दक्षिण मुंबईतील ‘सोशल क्लब’मधील धाडीत मिळालेल्या डायरीत पोलिसांच्या लाचखोरीच्या नोंदी ?


💥मुकेश अंबानी धमकी प्रकरण ; ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ कडून तपास सुरू💥

 मुंबई : दक्षिण मुंबईतील ‘सोशल क्लब’मधील धाडीत हाती लागलेल्या डायरीत मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत माहिती पुढे आल्याचा दावा ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने केला आहे डायरीत रकमेसोबत काही पोलीस अधिकारी आणि विभागांच्याही नोंदी आढळल्या आहेत हा हिशोब मुंबईतील विविध आस्थापनांकडून दरमहा येणाऱ्या हप्त्याचा असावा असा संशय असून त्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभाग आणि आयकर विभागाला माहिती दिली जाईल असेही एन.आय.ए.ने स्पष्ट केले आहे. 


गिरगाव चौपाटीसमोरील एका सोशल क्लबवर छापा घालून एन.आय.ए.ने शोधाशोध केली होती तसेच उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या या गुन्ह्य़ांत वापर झालेल्या सीम कार्डबाबत हाती लागलेल्या माहितीची खातरजमाही केली या कारवाईत एन.आय.ए.च्या हाती क्लबचालकाने जपून ठेवलेली नोंदवही आढळली त्यातून हा हिशोब समोर आला आहे अतिरिक्त सॉलीसीटर जनरल अनील सिंग यांनी  या डायरीचा हवाला देत वाझे यांनी मोठी रक्कम स्वीकारल्याचा दावा मे.न्यायालयात केला.

 या नोंदवहीत मुंबई पोलीस दलातील काही विभाग, अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे नावांसमोर रक्कम नमूद असून ती दरमहा स्वीकारलेल्या हप्त्याची असावी या माहितीची शहानिशा केली जाणार आहे असे एन.आय.ए.तील सूत्रांनी स्पष्ट केले याशिवाय वाझे यांच्या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीचे पारपत्र आढळले असून त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले मध्यरात्री एन.आय.ए. पथकाने वाझे यांना अंधेरी परिसरात नेले.तेथे त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या