💥परभणी जिल्ह्यात आज शुक्रवारी नव्याने आढळले ७३५ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात रुग्णालयात उपचारा दरम्यान आज शुक्रवारी १६ कोरोनाबाधितांचा झाला मृत्यू💥

परभणी (दि.१६ एप्रिल) - परभणी जिल्ह्यात कोरोना महामारी हळुवारपणे उग्ररुप धारण करतांना दिसत असून जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येसह मृत्यूचे प्रमाणही वाढतांना पाहावयास मिळत आहे एकंदर जिल्ह्यात कोरोना महामारीने हाहाकार माजवल्याचे दिसत आहे जिल्ह्यात आज शुक्रवार दि.१६ एप्रिल २०२१ रोजी तब्बल ७३५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून १६ कोरोनाबाधीत रुग्णांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या ५५३ कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ५ हजार ६०१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत जिल्ह्यात आजपर्यंत ६०७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत २४ हजार २३७ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी १८ हजार २९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख ७ हजार ५१९ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ८२ हजार ५५६ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर २४ हजार ८९ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ७३४ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या