💥मुख्यमंत्री ठाकरेंनी जाहीरपणे राज्यातील जनतेला लॉकडाउनचा इशारा दिला असताना महाविकास आघाडीतून मात्र विरोध...!


💥माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे सरकारसमोर मांडले सहा मुद्दे💥

राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे राज्यातील जनतेला लॉकडाउनचा इशारा दिला असताना महाविकास आघाडीतून मात्र विरोध होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी बैठक बोलावली असून रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत यावेळी राज्यात लॉकडाउन लागणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

 दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाउन लागल्यास काही बाबी लक्षात घेण्याची सूचना ठाकरे सरकारला केली आहे राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे २०२० मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट (?) मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे.

या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे परिणामी राज्य पातळीवर लॉकडाउनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास काही बाबींचा विचार करण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देणे लॉकडाउनचा कालावधी कमीत-कमी ठेवणे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या