💥परभणी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे


💥आरोग्य मंत्री व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना ई-मेल द्वारे पाठवलेल्या पत्रात आ.गुट्टे यांनी मागणी केली💥

      जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सीजनसह बेड्स व कर्मचारी वर्ग उपलब्ध असून येथे कोविड-१९ रुग्णांना योग्य प्रकारे उपचार देता येऊ शकतो. भविष्यातील कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेता व या महामारीला आळा घालने सोयीचे व्हावे याकरिता जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी २५ खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे.

                   या आशयाचे पत्र आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना ई-मेल द्वारे पाठवलेल्या पत्रात मागणी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या