💥संभाजीनगर (औरंगाबाद) चे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी एक दुरदृष्ठी असलेले अधिकारी...!


💥डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी भविष्यात महामारी परत येणार अशी दूरदृष्टी ठेवत त्या पद्धतीने नियोजन केले💥

✍️लेखक: सतीश सातोनकर. नानलपेठ परभणी

मुंबई ,ठाणे ,नाशिक ,पुणे ,नागपूर, अकोला ,वर्धा, अमरावती ,नांदेड हिंगोली, परभणी ,उस्मानाबाद, जालना, आणि संपूर्ण तळकोकण या सर्व ठिकाणी टेलिव्हिजनवर एकच बातम्या यायची ती म्हणजे   "रेमडीसीवर" या इंजेक्शनचा तुटवडा.....याला अपवाद होतं ते औरंगाबाद शहर आणि आजही ते अपवादच आहे...कारण आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी भविष्यात महामारी परत येणार अशी दूरदृष्टी ठेवत त्या पद्धतीने नियोजन केले.

 औरंगाबाद मेडिकल कॉलेज तसेच महानगरपालिका यांनाही या इंजेक्शनची कमतरता भासू नये यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मागच्या वर्षीच "रेमडीसीवर" मोठ्या प्रमाणावर खरेदी करून आणीबाणीच्या  प्रसंगी करोना महामारी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या जीवन रक्षणार्थ अत्यंत दूरदृष्टीने  नियोजनबद्ध अनुभव संपन्न असे उचललेले पाऊल या सर्वांचा परिणाम असा की महाराष्ट्रात औरंगाबाद शहराची कधीही औषधांचा तुटवडा म्हणून चर्चा झाली नाही..

" मराठवाड्यातील दोन-तीन जिल्ह्यांना आणीबाणीच्या प्रसंगी त्यांनी " रेमडीसीवर" इंजेक्शनचा पुरवठा केला व रुग्णांचे प्राण वाचवले तसेच खान्देशातील धुळे तर बाजूचा नगर जिल्हा व त्या  पलीकडे अगदी पुणे शहराला ही शासन आदेशाप्रमाणे या इंजेक्‍शनचा पुरवठा करून   शेकडो गरजू रुग्णांचे जीव वाचवले खरंच या व्यवस्थित नियोजनाला "डॉक्टर सुंदर कुलकर्णी पॅटर्न" असे  डॉक्टर सुंदर कुलकर्णी साहेबांच्या जागृत, नियोजनबद्ध, दूरदृष्टीला सन्मानित करावे त्यामुळे सतत कार्यरत राहणाऱ्या डॉक्टरांचा उत्साह वाढेल.

 औरंगाबाद संभाजीनगर येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी साहेब यांचे हे कार्य अनुकरणीय आहे आणीबाणीचा प्रसंग केव्हा कसा उभा राहिल यासाठीची कार्यकुशल अशी मॅनेजमेंट अगदी अद्भुत आहे मराठवाड्याच्या राजधानीमध्ये अत्यंत क्रिटिकल असे विदर्भ मराठवाडा व खानदेशातील रुग्ण यांनी दाखल करून घेत त्यांच्यावर यशस्वी विलास करून काहींना घरी पाठवले तर उर्वरित लोकांवर ते आजही उपचार करत आहेत.

 डॉक्टर सुंदर कुलकर्णी साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये मिळेल त्या ठिकाणी शासनाचा बदली आदेशाचे पालन करत आदिवासी भागामध्ये प्रचंड मोठे कार्य केले कोकण व खानदेशातील आदिवासी भागांमध्ये आजही त्यांचे नाव काढले जाते दुर्दैवाने या देशामध्ये सेवा भाव ठेवून आपल्या राष्ट्रासाठी उभे आयुष्य समर्पित करणाऱ्या आपल्या भोवतालच्या महान लोकांना आपण कधीच सन्मानित केले नाही त्यामुळे या देशातून चार लक्ष डॉक्टर आणि इंजिनिअर  युरोप व अमेरिकेला स्थायिक होत असतात. सन्माना अभावी आपली बौद्धिक संपदा हा देश सोडून जाते यापेक्षा मोठे लाजिरवाणे काय असावे.

करोना महामारी च्या कसोटीच्या प्रसंगांमध्ये आपली बदली कुठेही हो जिथे जाऊ तिथे इमानदारीने काम करू बदली रद्द व्हावी यासाठी कुठल्या राजकारणाकडे जाऊन पत्र न लावलेली माणसं  कुलकर्णी साहेबांच्या वर्गातली... आपली सेवा त्याग राष्ट्रनिष्ठा व आपण हाती घेतलेल्या कार्याला पूर्ण न्याय देणे हा मूळ स्वभाव आणि संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे खऱ्या अर्थाने आज औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर गाजत आहे.

" जया अंगी मोठेपण तया यातना कठीण"  या संत वचनाप्रमाणे कर्तव्यकठोर रहात असताना  प्रसिद्धीपराडमुख राहणे हार कमी लोकांना जमते.... औरंगाबाद संभाजी नगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी साहेब यांच्या कार्याची दखल  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब नक्कीच घेतील असा माझा ठाम विश्वास आहे औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यातील माझ्या मित्रांनी त्यांच्या बद्दल ची माहिती मला दिली त्याच्या आधारावर मी हा लेख लिहिलाय... आदरणीय डॉक्टर सुंदर कुलकर्णी साहेब मराठवाड्यातली जनता आपल्या महान वैद्यकीय सेवेची सदैव ऋणी राहील.

 अबोलपणे आपण अठरा ते वीस तास कार्यकर्ता रुग्णसेवेत व्यस्त असतात असे ऐकल्यानंतर वाटते या आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉक्टर सुंदर कुलकर्णी साहेबांची गरज आहे....आपण माझ्या चार मित्रांची प्राण वाचवले त्यांनी मला आपल्या बद्दलची माहिती दिली.आपल्याला न भेटता आपल्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आदर निर्माण झाला आहे.

 आई भवानी आपणास प्रचंड उदंड आयुष्य देवो व रुग्णसेवा आपल्या हातून असेच घडत राहू अखंड पणे....

 ✍️लेखक: सतीश सातोनकर. नानलपेठ .परभणी

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

 1. Dr. सुंदरराव कुलकर्णी यांच्यावरील लेख खरोखरीच अतिशय समर्पक असा आहे. त्यांची management खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे. डॉक्टरी पेशेमध्ये त्यांचे योगदान वादातीत आहे. त्याची नोंद सरकार दरबारी होणे अत्यंत आवश्यक आहे. मी स्वतः त्यांच्या कार्याचा अनुभव घेतलेला ahe. GREAT PERSON. Hats off to him

  उत्तर द्याहटवा
 2. सुंदर कुलकर्णी, खरंच सुंदर ,
  आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे।

  उत्तर द्याहटवा
 3. अत्यंत समर्पक वर्णन आपण केला आहे केवळ कोवीड रुग्णास नाही परंतु मिनी घाटी मध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णास असाच अनुभव आहे .प्रत्येक रुग्णाशी वैयक्तिक संपर्क त्याचे समाधान आणि वर्ग चार पासून ते तज्ञ डॉक्टर पर्यंत सहज संवाद . कुठलाही अभिनिवेश न ठेवता सर्वांशीच मनमोकळेपणाने व सहजतेने संवाद साधण्याची कला आणि या गंभीर वातावरणात ही सहज सुंदर विनोद करण्याची हातोटी खरोखरच एक *सुंदर* रत्न महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यास मिळाले आहे.
  परमेश्वर आपणास निरामय उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना

  उत्तर द्याहटवा
 4. Serving mother india,that too in such pandemic situation is a nobel deed.
  Only nobel prople can imagine doing it.
  Coward petty souls may flee abroad seeking monetary benifits.
  But one cannot forget the debts of our society.
  Great goung Sir.
  Proud of you.

  उत्तर द्याहटवा