💥पुर्णेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयम शिस्तीत प्रचंड जल्लोशा मध्ये संपन्न........!


💥सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व सर्वसामान्य जनता मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती💥

पूर्णा (दि.१५ एप्रिल) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाच्यावतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती प्रचंड जल्लोषात शिस्ती मध्ये जयघोषा मध्ये साजरी करण्यात आली आहे.कोविड-१९ ची पार्श्वभूमी लक्षात घेता मास्क सॅनिटायझर फिजिकल डिस्टन्सचे  पालन करून ज्येष्ठ नागरिक व लहान मुले  वगळून तरुण मुले मुली सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व सर्वसामान्य जनता मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती.


सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक  या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंती मंडळाचे चे अध्यक्ष भदंत डॉक्टर उप गुप्त महाथेरो कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे जयंती मंडळाचे पदाधिकारी नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे सन्माननीय नगर से वक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड एडवोकेट धम्मा जोंधळे मधुकर गायकवाड दादाराव पंडित रौफ उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड साहेब पोलीस निरीक्षक चोरमले साहेब व धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पोलीस कर्मचारी महिला मंडळ समता सैनिक दल यांच्या उपस्तीती मध्ये माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी ९.३० वाजता भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष शामराव जोगदंड यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

१०.३० वाजता शांतीनगर या ठिकाणी भंते पया वंश यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

दुपारी एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पारंपारिक वाद्यवृंदा मध्ये हर्ष उल्हास मध्ये मिरवणूक काढण्यात आली .

शहराच्या प्रमुख मार्गावरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या जय घोषा मध्ये शीस्ती मध्ये शहराच्या प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड दादाराव पंडित, श्याम कदम यांनी पुष्पहार अर्पण केला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ठरवून दिलेल्या वेळेच्या आत मिरवणुकीचा समारोप जयंती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे दादाराव पंडित यांनी उपस्थित संबोधित केले यावेळी नगरसेवकएडवोकेट हर्षवर्धन गायकवाड एडवोकेट धम्मा जोंधळे  माजी नगरसेवक सुनील जाधव बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल  गवळी यांची उपस्थिती होती.

भदंत डॉक्टर उप गुप्त महाथेरो भंते बोधी धम्म भंते प यावं श यांनी त्रिशरण पंचशील दिले शाहीर विजय  सातोरे यांनी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर एक प्रेरणादायी गीत गाऊन आशीर्वाद गाथेने जयंतीचा समारोप झाला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या