💥कुटुंबे बाधित झाल्यावर गृह विलगीकरण कसे ? ३६ हजारांहून अधिक रुग्णांसमोर जटील प्रश्न....!


💥मागील वर्षीच्या तुलनेत यंदा करोना विषाणू संसर्गाने संपूर्ण कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे💥

पुणे : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा करोना विषाणू संसर्गाने संपूर्ण कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे त्याचवेळी गृह विलगीकरणाची अंमलबजावणी करणेही अवघड जात आहे संपूर्ण कुटुंबाला करोना संसर्ग झाल्यानंतर त्यांपैकी एखाद्या रुग्णाची लक्षणे वाढली रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली तर कुटुंबातील कोणाला तरी रुग्णासोबत घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे स्पष्ट होत आहे शहरात सध्या ३६ हजारांहून अधिक रुग्णांनी गृह विलगीकरण स्वीकारले आहे अंजली (नाव बदलले आहे) आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब करोनाबाधित झाले. 

त्यामुळे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक महिलेची लक्षणे वाढली त्या वेळी अंजली आणि त्यांचे पती यांना रुग्णालयात खाट मिळवणे, रुग्णाला दाखल करणे या गोष्टी करण्यासाठी घराबाहेर पडावेच लागले साहजिकच गृह विलगीकरणाचा कटाक्षाने अवलंब त्या करू शकल्या नाहीत अंजली म्हणाल्या, घर मोठे आहे आणि घरातील सर्व जण बाधित आहोत सौम्य लक्षणे आहेत म्हणून फॅमिली डॉक्टरांनी आम्हाला घरीच विलगीकरण पाळण्याबाबत सूचना केल्या. 

मात्र सासूबाईंना त्रास जाणवू लागल्याने आम्हाला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी बाहेर पडावेच लागले. हे करताना मास्क ( मुखपट्टी),चा वापर केला मात्र गृह विलगीकरण पाळता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. संदीप म्हणाले, माझी आई, वडील आणि मी तिघेही करोनाबाधित झाल्याने गृह विलगीकरणात राहण्यास सुरुवात केली वडिलांची लक्षणे वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेणे आवश्यक होते आम्ही करोनाबाधित असल्याने इतर कोणाला मदतीसाठी बोलवणे शक्य नव्हते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या