💥परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन...!


💥त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे💥

परभणी (दि.२४ एप्रिल):-अत्यंत मनमिळावू म्हणून ओळखले जाणारे परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे आज आज दि२४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता कोरोनाने दुःखद निधन झाले. १५ एप्रिल रोजी अत्यवस्थ वाटल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे ३१ मार्च अर्थात आर्थिक वर्षाच्या ताळेबंद अनुषंगाने त्यांनी जिल्हा कोषाधिकारी पदाची संपूर्ण दक्षता घेऊन जबाबदारी पार पाडली.  

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथे कोषागार अधिकारी या पदी कार्यरत असलेले श्री सुनील कोंडीबा वायकर यांचा जन्म दि २एप्रिल १९६८चा.  ते २ मे १९९५ रोजी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब लेखाधिकारी या पदावर सेवेत दाखल झाले. कालांतराने त्यांना गट अ पदी पदोन्नती मिळालेली होती. 

त्यांच्या एकूण 26 वर्षांच्या सेवकाळामध्ये त्यांनी कोषागार कार्यालय उस्मानाबाद, बीड, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर, स्थानिक निधी लेखा बुलढाणा, जिल्हा परिषद वाशीम, जिल्हा कोषागार कार्यालय परभणी इ ठिकाणी लेखाधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी, सहाय्यक संचालक, कोषागार अधिकारी अशा विविध पदांवर सेवा बजावली. मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले श्री वायकर हे ९ जुलै २०१९ रोजी कोषागार अधिकारी परभणी या पदी रुजू झाले होते. त्यांच्या सुस्वभावी व प्रेमळ वागणुकीमुळे ते कोषागार कर्मचाऱ्यांचे लाडके अधिकारी होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी वृंद शोकाकुल झाला आहे.

( अधिकृत वृत्त - जिल्हा माहिती कार्यालय परभणी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या