💥औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 84400 कोरोनाबाधीत औषधोपचारा नंतर झाले कोरोना मुक्त...!


💥जिल्ह्यात 1718  कोरोना रुग्णांची नव्याने भर ; 1239 रुग्ण बरे💥

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1239 जणांना (मनपा 850, ग्रामीण 389) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 85400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1718 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 103254 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2052 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15802 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

💥शहरात आज 3341 जणांनी घेतले कोविड लसीचे डोसेस💥

औरंगाबाद शहरात मनपाच्या वतीने 143 केंद्रांवरून पात्र नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसींचे डोस देणे चालू आहे. यामध्ये शासकीय 123 आणि 20 खाजगी लसीकरण केंद्रे आहेत. या मोहिमेतंर्गत आज 14 एप्रिल रोजी 3341 पात्र नागरिकांनी डोस घेतले. यामध्ये पहिला डोस 2706 जणांनी तर दुसरा डोस 635 जणांनी घेतला. यामध्ये आरोग्य कर्मचारी,  फ्रंट लाईन योद्धे, 45 वयोगटाच्या पुढील आणि 45 वयापुढील सहव्याधी असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. परिणामी एकूण लसीकरणाचा आकडा (दोन्ही डोसेस मिळून) 1,55,715 पर्यंत पोहोचला आहे.

💥शहराचा एकूण चाचण्यात कोरोना बाधित होणारांचा दर 42.94  %💥

शहरातील  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.  एकिकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यु होणारांचे प्रमाणही वाढताना दिसते आहे. रूग्णवाढ आणि मृत्युदरातही वाढ झालेली असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट देखील घटला आहे.  दि.  14  एप्रिल 2021  रोजी  हे प्रमाण 85.64  %  एवढे नोंदले गेले. शहराचा कोरोनाचा मृत्यु दर हा दि.  14  एप्रिल 2021  रोजी 2. 01 % तर जिल्ह्याचा 2.30 % आहे. कोरोनाचा शहराचा बाधित होणारांचा दर ही वाढला आहे.  दि.  14  एप्रिल 2021  रोजी एकूण चाचण्यामध्ये बाधित होणारांचा दर 42.94  % नोंदला गेला.

💥रेल्वे स्टेशन व विमानतळ येथे 139 प्रवाशांची चाचणी : 18 प्रवासी पॉझिटिव्ह आढळले💥

औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे प्रवाश्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे .

1) रेल्वेस्टेशन येथे 14 एप्रिल 2021 रोजी 104 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 13 एप्रिल घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 14 एप्रिल रोजी  प्राप्त झाला असुन यात 18 प्रवासी पॉझिटिव्ह आढळले.

2) विमानतळ येथे 14 एप्रिल 2021 रोजी 35 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 13 एप्रिल रोजी  घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 14 एप्रिल रोजी  प्राप्त झाला असुन यात  कोणीही  प्रवासी पॉझिटिव्ह आढळले नाहीत.

एंट्री पॉईंट कोरोना चाचणीत 61 पॉझिटिव्ह आढळले

औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील एंट्री पॉईंटवर अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे . आज दि. 14 एप्रिल 2021 रोजी शहरातील 6 एंट्रीपॉईंट वर कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली.यात

1) चिकलठाणा येथे  256 पैकी 19 पॉझिटिव्ह2) हर्सूल टी पॉईंटवर 193  पैकी 13 पॉझिटिव्ह

3) कांचनवाडी येथे  155 पैकी 13 पॉझिटिव्ह

4) झाल्टा फाटा येथे 183 पैकी 2 पॉझिटिव्ह

5) नगर नाका येथे 368 पैकी 13 पॉझिटिव्ह

6) दौलताबाद टी पॉईंट येथे  267 जणांची टेस्ट करण्यात आली. यात 1 जण पॉझिटिव्ह आढळला.

सरकारी कार्यालयात अँटीजन कोरोना चाचणी 1 पॉझिटिव्ह आढळला

आज दि. 14 एप्रिल  रोजी  शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार व  आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख सरकारी कार्यालयात  येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची अँटीजन कोरोना चाचणी घेण्यात आली  आहे.यात

1.मनपा मुख्यालयात  1 जणांची अँटीजन चाचणी घेण्यात आली यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.

2 .पोलीस आयुक्त कार्यालयात  8 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली यात 1 पॉझिटिव्ह आढळला.

3 उच्च न्यायालयात 1 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.

4. आरटीओ कार्यालयात कोरोना चाचणी घेण्यात आली नाही.

5. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना चाचणी घेण्यात आली नाही.

6.विभागीय आयुक्त कार्यालयात 17 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.यात कोणीही  पॉझिटिव्ह आढळले नाही.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नागरिकांला. पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :

मनपा (771)

औरंगाबाद 5, सातारा परिसर 39, बीड बायपास 19, शिवाजी नगर 9, गारखेडा 7, जय भवानी नगर 8, घाटी 2, सिडको 1, चिकलठाणा 12, केळीबाजार 1, हायकोर्ट कॉलनी 1, जटवाडा रोड 4, कासलीवाल मार्वल 4, सप्तश्रृंगी नगर 1, न्यु नंदनवन कॉलनी 1, माऊली नगर 1, बालाजी नगर 5, नक्षत्रवाडी 4, रामनगर 8, वेदांत नगर 3, उस्मानपूरा 9, पद्मपूरा 11, जालान नगर 1, दशमेश नगर 2, पडेगाव 10, श्रीनिकेतन कॉलनी 1, एसबीएच कॉलनी 4, आकाशवाणी 1, भानुदास नगर 1, शिल्प नगर 3, बनेवाडी 1, प्रताप नगर 9, बन्सीलाल नगर 2, साईनगर 1, कांचनवाडी 7, एन-3 येथे 4, भावसिंगपूरा 6, द्वारकापूरी 1, मिटमिटा 3, अजब नगर 5, शहानूरवाडी 2, समर्थ नगर 2, ऑरेंज सिटी पैठण रोड 2, गजानन नगर 5, शंकर नगर 1, न्यु विशाल नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 1, एन-5 येथे 3, जाधववाडी 3, कैलाश नगर 1, एन-4 येथे 8, हर्सूल 6, टाऊन सेंटर 2, एन-2 येथे 6, कॅनॉट प्लेस 1, एन-7 येथे 10, कुशल नगर 1, राधास्वामी कॉलनी 2, गोकुळवाडी 1, नारळी बाग 1, नुतन कॉलनी 2, चौराहा 2, नागेश्वरवाडी 1, सहकार नगर 4, क्रांती चौक 1, समता नगर 3, महेश नगर 1, पगारिया निवास 1, अजित सिड्स 1, ज्योती नगर 1, हर्सूल टी पाँईट 2, संगीता कॉलनी 1, भाग्योद्यय नगर 2, देवळाई 7, शहा नगर 1, मिलिंद नगर 1, विजयंत नगर 2, मंजूर प्राईड 1, बाळापूर फाटा 3, आलोक नगर 4, ईटखेडा 2, रामगोपाल नगर 1, देशपांडे पूरम 2, राज नगर 1, गुरूप्रसाद नगर 2,  मुकुंद नगर 3, प्रकाश नगर 1, पुराणिक नगर 1, महाजन कॉलनी 1, सिंधी कॉलनी 1, खोकडपूरा 1, एन-6 येथे 7, एस.टी.कॉलनी 1, म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर 1, लायन्स क्लब कॉलनी 1, महालक्ष्मी चौक 1, म्हाडा कॉलनी 1, विनय कॉलनी 1, तारांगण नगर 1, ज्ञानेश्वर नगर 1, एन-9 येथे 8, विठ्ठल नगर 3, राजीव गांधी नगर 1, न्यु एस.टी.कॉलनी 1, सुराणा नगर 2, महावीर नगर 2, ठाकरे नगर 3, नाईक नगर 7, गुरु सहाणी नगर 1, मुकुंदवाडी 4, एन-1 येथे 1, उत्तरानगरी 1, हनुमान नगर 1, दर्गा रोड 1, विजय नगर 1, उल्का नगरी 5, पुंडलिक नगर 5, भारत नगर 1, विष्णू नगर 1, खडकेश्वर 3, एन-11 येथे 3, भडकल गेट 1, जूना बायजीपूरा 1, रोझा बाग 1, मल्हार चौक 1, विशाल नगर 5, श्रीकृष्ण नगर 1, परिजात नगर 1, छत्रपती नगर 2, पिसादेवी रोड 3, कोतवालपूरा 1, होनाजी नगर 1, प्रगती कॉलनी 4,  ज्युब्ली पार्क 1, सारा वैभव 2, नवजीवन कॉलनी 2, मयुर पार्क 4, टी.व्ही.सेंटर 4, एन-12 येथे 3, एमआयडीसी 1, देशमुख नगर 1, एन-8 येथे 5, एन-10 येथे 1, फुले नगर 1, जाधवमंडी 1, सनी सेंटर 1, नंदादिप हाऊसिंग सोसायटी 1, साफल्य नगर 1, म्हसोबा कॉलनी 1, सुरेवाडी 1, घृष्णेश्वर कॉलनी 2, दीप नगर 1, पोलीस क्वार्टर मिलकॉर्नर 1, दिवान देवडी 1, हिमायत बाग 1, एकता नगर 1, नंदनवन कॉलनी 1, अशोक नगर 1, एम्स हॉस्पीटल 1, समनानी नगर 1, मिसारवाडी 1, ईएसआयसी हॉस्पीटल 1, पन्नालाल नगर 1, जवाहर कॉलनी 2, साई हार्मोनी सोसायटी 1, न्यायनगर 1, नॅशलन कॉलनी 1, स्वप्न नगरी 1, सुधाकर नगर 2, देवा नगरी  1, नवनाथ नगर 1, दिशा संस्कृती पैठण रोड 1, मिलिट्री कँम्प छावणी 2, साईसंकेत सोसायटी 1, न्यु हनुमान नगर 2,  उत्तरा नगरी 2, शिवशंकर कॉलनी 1, एमआयटी कॉलेज 1, कासारी बाजार 1, सिल्कमिल कॉलनी 1, जयानगर 1, श्रेयनगर 1, रैल्वेस्टेशन 1, अन्य 274

ग्रामीण (947)

बजाज नगर 1, सिडको वाळूज 1, ए.एस.क्लब वाळूज 3, वालसावंगी 1, अजिंठा 1, दावरवाडी 1, सिल्लोड 3, हनुमंत खेडा 1, वाळूज एमआयडीसी 1, फुलंब्री 1, पंढरपूर 1, पिसादेवी 5, आडगाव सरक 1, लासूर स्टेशन वैजापूर 1, गिरनार तांडा 1, चितेगाव 1, केऱ्हाळा 1, पळशी खुर्द कन्नड 1, पैठण 1, अंधारनेर कन्नड 1, मांडकी 1, हर्सूल गाव 2, पळशी औरंगाबाद 1, सावखेडा सिल्लोड 1, गंगापूर 1, पिंपळखुटा 1, गिरिजा शंकर विहार 1, लाडसावंगी 1, कन्नड 1, टोणगाव 1, आसेगाव गंगापूर 3, अन्य 905

मृत्यू (27)

घाटी (18)

46, स्त्री, जवाहर कॉलनी

52, पुरूष, वैजापूर

60, पुरूष, सिडको

45, स्त्री, सोयगाव

70, स्त्री,सातारा परिसर

45, स्त्री, नवजीवन कॉलनी, औरंगाबाद

76, स्त्री, जयसिंगपुरा

52, पुरूष, पैठण

53, पुरूष, मोतीकारंजा

67, स्त्री, पडेगाव

35, स्त्री, कन्नड

45, पुरूष, पानचक्की

65, पुरूष, कन्नड

55, पुरूष, सोन्नापूर, पैठण,

67, स्त्री, पहाडसिंगपुरा

55, स्त्री, वैजापूर

55, पुरूष, अंभई

66, स्त्री, जवाहर कॉलनी, औरंगाबाद

जिल्हा सामान्य रुग्णालय (03)

65, पुरूष, लिंबगाव, औरंगाबाद

65, पुरूष, शिवशंकर कॉलनी, कन्नड

60, स्त्री, फुले नगर, हर्सुल

खासगी रुग्णालय (6)

77,स्त्री, गेवराई गुंगी, फुलंब्री

66, पुरूष, रेल्वे स्टेशन परिसर

70, पुरूष, बीड बायपास

84, पुरूष, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद

93, पुरूष, एन पाच सिडको

60, पुरूष, शिवशंकर कॉलनी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या