💥मुंबईसह कोकणात हलका पाऊस; तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे....!


💥महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणंच वातावरण ढगाळ राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे💥

मुंबई (09 एप्रिल) : मागील काही दिवसांपासून उष्णतेचा उग्र अवतार दाखवल्यानंतर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा काही अंशी  घसरला आहे. आग ओकणाऱ्या महाराष्ट्रातील हवामानाने आता यु टर्न घेतला, राज्यभर ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे मुंबईसह, ठाणे आणि कोकण पट्ट्यात हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणंच वातावरण ढगाळ राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

काल मुंबईसह ठाणे आणि कोकणात हलका पाऊस झाल्यानंतर पुढील पाच दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि विदर्भातील काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी महाराष्ट्रातलं तापमान घसरलं असून येत्या चार दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या