💥जपानमध्ये एका रोमियोने एकाचवेळी ठेवले चक्क 35 तरुणींसोबत प्रेमसंबंध...!


💥35 तरुणींना फसवल्या प्रतरणी पाेलीसांनी केली अटक,अटकेनंतर धक्कादायक कारण आले समोर💥

एखाद्या तरुणाचे एकाच वेळी दोन किंवा तीन तरुणींशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचे आपण ऐकले आहे. मात्र जपानमध्ये एका रोमियोने एकाचवेळी चक्क 35 तरुणींसोबत प्रेमसंबंध ठेवले. एकाचवेळी एवढ्यासाऱ्या तरुणींना फसवल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने सांगितलेले कारण धक्कादायक आहे.

ताकाशी मियागावा (39) असे त्या व्यक्तीचे नाव असून सध्या तो जपानमध्ये जपानी रोमियो म्हणून ओळखला जात आहे. ताकाशी हा एक साधा सेल्समॅन आहे. ताकाशीचे काही वर्षांपूर्वी एकाच तरुणीशी अफेयर होते. त्याच्या वाढदिवसाला त्या तरुणीने त्याला महागडे गिफ्ट्स दिले. ते पाहून त्याचे डोळे फिरले.

जर आपल्या हिच्यासारख्या अजून काही गर्लफ्रेंड असतील तर आपल्याला बरेच गिफ्ट्स मिळतील म्हणून त्याने एकापेक्षा अधिक अफेयर करायला सुरुवात केली. तो शक्यतो श्रीमंत मुली हेरायचा. तो त्याच्या प्रत्येक गर्लफ्रेंडला त्याची जन्मतारिख वेगळी सांगायचा. त्यामुळे प्रत्येक गर्लफ्रेंडसोबत त्याला वाढदिवस साजरा करायला मिळायचा. असं करत करत सध्या त्याच्या 35 गर्लफ्रेंड होत्या.

तो दर महिन्याला तिघींसोबत त्याचा वाढदिवस साजरा करायचा. त्यामुळे त्याला गिफ्ट्सही खूप मिळायचे. मात्र एकेदिवशी त्याच्या एका गर्लफ्रेंडला त्याच्यावर संशय आला. तिने त्याच्यावर पाळत ठेवली. तेव्हा तिला धक्काच बसला. ताकाशी हा अनेकजणींना भेटायला जात होता. त्यांच्यासोबत त्याचे प्रेमसंबध होते असे तिला समजले. त्यामुळे तिने ताकाशी विरोधात पोलिसांत तक्रार केली.

गर्लफ्रेंडच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ताकाशीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या चौकशी दरम्यान पोलिसांसमोर त्याने धक्कादायक माहिती सांगितली. त्याच्या 35 गर्लफ्रेंडपैकी एकीवरही त्याचे प्रेम नव्हते. तो फक्त त्यांच्याकडून मिळणाऱ्या गिफ्ट्स साठी त्याच्यासोबत राहायचा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या