💥औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक : सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 20 मे रोजी....!


💥
सदर प्रकरणात राज्य शासन,राज्य निवडणूक आयोग व मनपाच्या वतीने शपथपत्र सादर करण्यात आलेली नाहीत
💥

 ✍️ मोहन चौकेकर                                                  

औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण आज मा‌. प्रबंधक यांच्या समोर ठेवण्यात आले होते. अद्याप सदर प्रकरणात राज्य शासन, राज्य निवडणूक आयोग तसेच मनपा यांच्या वतीने शपथपत्र सादर करण्यात आलेली नाहीत. याचिका कर्ते श्री समीर राजूरकर यांना कोणत्याही प्रतिवादी चे शपथपत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. मागील प्रमाणे स्थिती जैसे थे असून, माननीय प्रबंधक साहेबांनी सदर प्रकरणात पुढील तारीख २०/०५/२०२१ दिली आहे. 

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या