💥पालम येथे कोविड-19 शिवसेना मदत केंद्राचे आज उद्घाटन संपन्न....!


💥परभणीचे खा.संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख कदम यांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न💥

पालम  :- तालुक्यातील  नागरिकांची सध्याच्या कोरोना महामारी काळात रुग्णाची होणारी प्रचंड हेळसांड पाहता परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या उपस्थितीत आज पालम  येथे कोविड-19 शिवसेना मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.गंगाखेड रोडवर शिवनेरी कॉलेज जवळील तालुका शिवसेना कार्यालयात आज दिनांक 23 एप्रिल रोजी मदत केन्द्राचे उद्घाटन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख विशालभाऊ कदम,तालुकाप्रमुख हनुमंतराव पौळ,उपतालुका प्रमुख श्रीकांत कराळे,शिवाजी खंडागळे, उपशहरप्रमुख पांडूरंग रोकडे,सुग्रीव पौळ,युवासेना शहरप्रमुख गजानन सिरस्कर, शहर समन्वयक सौरव दिवटे,तालुका सचिव सचिन पवार,अक्षय पौळ,राहुल हनवते व इतर पदाधिकारी तसेच शहरातील तरुण उद्योजक गजानन सिरस्कर, लहुभाऊ रोकडे उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या