💥राज्यातील वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची पुर्व परिक्षा स्थगीत...!


💥वाढत्या कोरोना संसर्गामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती💥

मुंबई (दि. 9 एप्रिल) : राज्यात कोरोना विषाणूंच्या वाढत्या संक्रमणामुळे आणि बाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अखेरीस 11 एप्रिल 2021 रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज 9 एप्रिल 2021 रोजी दुपारी घेण्यात आला. 11 एप्रिल ला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला गेल्या महिन्यातच एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. मात्र वाढत्या कोरोना संसर्गामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

राज्य सरकारने 30 एप्रिल 2021 पर्यंत कठोर निर्बंध लावले असून शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन आहे. त्यामुळे परीक्षा 11 एप्रिलला होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता.  या परीक्षेची तयारी करणार्‍या अनेक उमेदवार परीक्षार्थी सध्या कोरोना बाधित झाले आहेत. पुणे, मुंबई आणि इतर मोङ्ग्या प्रमुख महानगरांत सुद्धा ही परीक्षार्थी विद्यार्थी संक्रमित झाले आहेत. परिणामी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या