💥मराठा सेवा संघाने शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या घरगुती रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न...!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ गुलाब इंगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची उपस्थिती💥 

पुर्णा (दि.४ मार्च) - पुर्णा तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने घरगुती रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्णा तालुक्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ गुलाब इंगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विशालराव कदम,सोपानराव भुसारे, तवर सर, मुंजाभाऊ कदम, माने सर इत्यादी उपस्थित होते.

🏆मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक मा विशाल कदम यांच्या वतीने कु.रिया रमेश लोखंडे, द्वितीय क्रमांक मा. गजाननराव आंबोरे (तालुकाध्यक्ष रा यु काँ) यांच्यावतीने प्रथमेश सुधीर कराळे, तृतीय क्रमांक मा. अशोक बोकारे सभापती (पं स पूर्णा) यांच्या वतीने भगवती आनंद झरकर यांना तर प्रोत्साहनपर बक्षीस आशा आनंदराव सोनटक्के (सरपंच पिंपरण) व सोपानराव भुसारे (मुख्याध्यापक आंबेडकर हायस्कूल पूर्णा) यांच्या वतीने सुधीर भगत, वेदांत भालेराव रेणुका आंबोरे, अश्विनी बांदलवाडे यांना विभागून देण्यात आले .

स्पर्धेचे परीक्षण नवनाथ भताने, अंगद भालेराव यांनी केले सूत्रसंचालन गंगाधर भुसारे यांनी तर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद आंबोरे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव विठ्ठल शिंदे, गजानन तांबे, मारोती शिंदे, सोनाजी ढोणे, संदीप आंबोरे, बालाजी आडेपवार आदींनी प्रयत्न केले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या