💥परभणी तालुक्यातील आर्वी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर....!


💥आरोग्य विभाग कर्मचारी व त्यांचे वाहने वगळता अऩ्य व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास बंदी💥

परभणी (दि.५ मार्च) - तालुक्यातील आर्वी या गावात काल गुरुवार दि.४ मार्च २०२१ रोजी १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली असून प्रशासनानाकडून आर्वी ग्रामपंचायत हद्द प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आर्वी गावातील १३ व्यक्ती गुरुवारी कोरोनाबाधित आढळल्या. शासनाच्या कंटेंटमेंट प्लॅनमधील सूचनानुसार मौजे आर्वी ग्रामपंचायत हद्द गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या हद्दी ग्रामपंचायत व संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमुख यांनी सील कराव्यात, प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात आली. आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व वैद्यकीय सेवा सुरळीत राहण्याकरिता ग्रामपंचायत, आरोग्य विभाग कर्मचारी व त्यांचे वाहने वगळता अऩ्य व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या