💥कोरोना प्रतिबंधक लसीमुळे रक्तात गाठी होण्याचा कोणताही पुरावा नाही; अस्ट्राझेनेकाचे स्पष्टीकर...!

💥लसीकरण झालेल्या १७ दशलक्षाहून अधिक व्यक्तींच्या आरोग्य अहवालाचे परीक्षण केले त्यावरून त्यांनी हा निष्कर्ष💥

अस्ट्राझेनेकाचे (AstraZeneca) ने  सांगितले की त्यांच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीद्वारे लसीकरण केलेल्या लोकांच्या रक्तात गाठी निर्माण होण्याचा धोका वाढल्याचा काही पुरावा मिळालेला नाही.AstraZeneca ने यु.के. आणि युरोपियन युनियनमधील लसीकरण झालेल्या १७ दशलक्षाहून अधिक व्यक्तींच्या आरोग्य अहवालाचे परीक्षण केले त्यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. 

काही देशांमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी रक्तात गाठी होण्याच्या लोकांच्या तक्रारींमुळे AstraZeneca लसींचा वापर स्थगित केला होता आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, आईसलँड आणि नेदरलँडमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी AstraZeneca ची लस घेतलेल्या लोकांच्या रक्तात गाठी निर्माण होण्याच्या मुद्द्यांवरून या लसीचा वापर स्थगित केला आहे तर ऑस्ट्रियाने गेल्या आठवड्यात AstraZeneca लसींची एक बॅच वापरणे थांबवले होते आणि कोग्युलेशन डिसऑर्डरमुळे झालेल्या मृत्यूची चौकशी केली होती.

 युरोपियन मेडिसीन एजन्सीने म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणामुळे या घटना घडल्या आहेत असे कोणतेही संकेत दिसत नाहीत औषध निर्माता म्हणाले, डीप व्हेन थ्रोम्बोसिसच्या १५ घटना आणि पलमोनरी एम्बोलिझमच्या २२ घटना आतापर्यंत नोंदल्या गेल्या आहेत जे इतर परवानाकृत कोविड -१९ प्रतिबंधक लसींप्रमाणेच आहेत.AstraZeneca कंपनीने म्हटले आहे की आम्ही आणि युरोपियन आरोग्य अधिकाऱ्यांनी अतिरिक्त चाचण्या घेतल्या आहेत आणि झालेल्या चाचण्यांपैकी कशाचाही चिंता करण्याचे कारण दिसून आले नाही. 

मासिक सुरक्षा अहवाल पुढील आठवड्यात EMA वेबसाइटवर लोकांसाठी प्रदर्शित केला जाईल....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या